भारतीय क्रिकेट संघाचा विद्यमान कर्णधार विराट कोहली याने येत्या टी२० विश्वचषक २०२१ नंतर या स्वरुपातील नेतृत्त्वपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या या घोषणेनंतर हळूहळू भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममधील गोष्टी बाहेर येत असल्याचे दिसत आहे. नुकताच कोहलीने रोहित शर्मा याला मर्यादित षटकांच्या संघाच्या उपकर्णधारपदावरुन हटवण्याचा प्रस्ताव बीसीसीआयकडे मांडला होता, अशी माहिती पुढे आली होती. यानंतर आता कोहलीच्या व्यवहारामुळे संघ प्रशिक्षक आणि खेळाडू त्रस्त झाले असल्याची खळबळजनक माहिती समोर येते आहे.
‘द टेलिग्राफम’धील वृत्तानुसार, मागील बऱ्याच काळापासून कोहली खराब फलंदाजी फॉर्मशी झगडत आहे. याचा परिणाम त्याच्या कर्णधार म्हणून निर्णय घेण्याच्या क्षमतेवरही होत असल्याचे दिसले. यामुळेच त्याचे संघातील इतर खेळाडूंसोबतचे संबंध बिघडत चालले होते. बीसीसीआयला भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये चालू असलेल्या घटनांची भनकही लागली होती.
याचमुळे बीसीसीआय आता टी२० विश्वचषकानंतर टी२० प्रकारातील संघाची कमान रोहित शर्मा याच्या हाती सोपण्याचा विचारात आहे. रोहितविषयी बोलताना सूत्राने सांगितले की, “रोहित, ज्याला पुढे भारतीय टी२० संघाचा कर्णधार बनवले गेले पाहिजे. अगदी अजिंक्य रहाणेप्रमाणे. त्याने ऑस्ट्रेलियामध्ये संघाचे नेतृत्त्व करताना अद्भुत कामगिरी केली होती. खरे तर, रोहित संघातील इतर खेळाडूंसाठी एका मोठ्या भावासारखा आहे. त्याचा युवा खेळाडूंवर विश्वास आहे. त्यामुळे तो या पदासाठी योग्य पर्याय ठरेल.”
महत्त्वाच्या बातम्या-
यंदा विराटसाठी ‘आर या पार’ स्थिती! फेल झाल्यास आरसीबीच्या कर्णधारपदावरुन होऊ शकते हाकालपट्टी
विराटने संधी दिलेली ‘पंचरत्ने’, आज गाजवतायेत टी२०ची मैदाने