वुमेन्स प्रिमियर लीगमध्ये रविवारी (12 मार्च) मुंबई इंडियन्स विरुद्ध युपी वॉरियर्झ हा सामना खेळला गेला. ब्रेबॉर्न स्टेडियम येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात दोन्ही संघ विजयाच्या इराद्याने मैदानात उतरले. त्याचवेळी या सामन्याच्या दुसऱ्या डावात एक ऐतिहासिक घटना पाहायला मिळाली. तिसऱ्या पंचांनी डीआरएसवर दिलेल्या निर्णयाला पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांकडेच सत्य शोधण्यासाठी पाठवण्यात आले. क्रिकेटचा इतिहासात यापूर्वी असा प्रकार कधीही घडला नव्हता.
https://twitter.com/wplt20/status/1634960958488711168?t=5POenM_WGbcOtXmamAn8JA&s=19
या सामन्यात युपी संघाने प्रथम फलंदाजी करताना 159 धावा उभ्या केल्या. या धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्ससाठी हायली मॅथ्यूज व यास्तिका भाटिया यांनी दमदार सुरुवात दिली. दोघींनी 4.5 षटकात 40 धावा केल्या. मात्र, पाचव्या चेंडूवर एक ऐतिहासिक घटना पाहायला मिळाली. सोफी एक्लस्टन हिच्या चेंडूवर मॅथ्यूज चकली व चेंडू बॅट व पायावर आदळला. त्यावर युपीच्या खेळाडूंनी जोरदार अपील केले. पंचांनी हे अपील फेटाळून लावल्याने युपीची कर्णधार हिलीने डीआरएसची मागणी केली.
https://twitter.com/mufaddal_vohra/status/1634952347188330501?t=GnrdDecxXJtwVEEtdP4o2A&s=19
टेलिव्हिजनवर दिसत असताना पहिल्यांदा चेंडू बॅटवर आदळल्याचे दिसले. मात्र, एका बाजूने पाहिल्यानंतर चेंडूचा मॅथ्यूजच्या शुजवर पहिला स्पर्श झाल्याचे दिसून येत होते. त्यावर तिसऱ्या पंचांनी मॅथ्यूजला बाद ठरवले. मात्र, मॅथ्यूज मैदानाबाहेर न गेल्याने पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांनी रिव्ह्यू पाहिला. त्यामध्ये चेंडू ने पहिल्यांदा बॅटलाच स्पर्श केल्याचे स्पष्टपणे दिसून आले. तेव्हा तिसऱ्या पंचांनी आपलाच निर्णय बदलत मॅथ्यूजला नाबाद ठरवले.
अशाप्रकारे तिसऱ्या पंचांनी आपलाच निर्णय बदलण्याची ही क्रिकेट इतिहासातील पहिलीच घटना असल्याचे सांगितले जात आहे. तसेच यामुळे रिव्ह्यू सिस्टीमवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
(Big DRS Confusion In WPL Third Umpire Reverse Own Decision In Mumbai Indians And UP Warriorz Match)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विश्वविजेत्या इंग्लंडची नाचक्की! दुबळ्या बांगलादेशने सलग दुसऱ्या सामन्यासह केली टी20 मालिका नावे
जोड्या जबरदस्त! टीम इंडियाच्या फलंदाजांनी अहमदाबादमध्ये रचला इतिहास, 90 वर्षात प्रथमच असं घडलं