Indian players fitness test: आशिया कप 2025 पूर्वी भारतीय संघासाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, शुबमन गिल आणि इतर अनेक भारतीय खेळाडूंनी फिटनेस टेस्ट पास केली आहे. भारतीय खेळाडूंच्या फिटनेसवर अनेक प्रश्नचिन्ह होते. शुबमन गिल नुकताच आजारातून बरा झाला होता, त्यामुळे त्याच्या फिटनेसकडे सर्वांचे लक्ष लागले होते. बुमराहचे पूर्णपणे तंदुरुस्त असणे ही देखील भारतासाठी दिलासादायक बाब आहे. (Jasprit Bumrah Asia Cup return) आशिया चषक 9 सप्टेंबरपासून सुरू होणार असून भारतीय संघ आपला पहिला सामना (10 सप्टेंबर) रोजी यूएईविरुद्ध खेळेल.
आशिया चषकाची सुरुवात होण्यापूर्वीच भारतीय संघासाठी ही चांगली बातमी आहे. रेव्हस्पोर्ट्सच्या रिपोर्ट्सनुसार, जसप्रीत बुमराह, शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, शार्दुल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी सेंटर ऑफ एक्सलन्स (CoE) येथे फिटनेस टेस्ट उत्तीर्ण केली आहे. (Indian players fitness test)
रोहित शर्मानेही फिटनेस टेस्ट यशस्वीरित्या पास केली आहे. (Rohit Sharma fitness update) शुबमन गिल नुकताच आजारातून उठल्यामुळे त्याच्या फिटनेस टेस्टकडे सर्वांचे लक्ष लागून होते. आशिया चषक 2025 साठी गिलने टी20 संघात पुनरागमन केले आहे आणि त्याला उपकर्णधारपदाची जबाबदारीही देण्यात आली आहे. (Shubman Gill fitness Update)
आशिया चषकात सहभागी होण्यासाठी भारतीय संघ (4 सप्टेंबर) रोजी यूएईसाठी रवाना होईल. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला आपला पहिला सामना (10 सप्टेंबर) रोजी यूएईसोबत खेळायचा आहे. त्यानंतर (14 सप्टेंबर) रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात महामुकाबला होईल. (19 सप्टेंबर) रोजी भारतीय संघ ओमानशी भिडणार आहे. स्पर्धेसाठी भारतीय संघ यापूर्वीच जाहीर झाला आहे. (Asia Cup 2025 India match schedule)
सलामीवीर म्हणून निवडकर्त्यांनी अभिषेक शर्मा आणि गिलवर विश्वास दाखवला आहे, तर संजू सॅमसनलाही संघात स्थान मिळाले आहे. राखीव यष्टीरक्षक म्हणून जितेश शर्माला ठेवण्यात आले आहे. खराब फॉर्म असूनही रिंकू सिंग आपले स्थान वाचवण्यात यशस्वी ठरला आहे. गोलंदाजीची कमान जसप्रीत बुमराहच्या हाती देण्यात आली आहे, त्याला अर्शदीप आणि हर्षित राणा साथ देताना दिसतील. (Asia Cup 2025 Team India squad)






