एमएस धोनी याच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्ज शनिवारी (20 मे) प्लेऑफसाठी पात्र ठरला. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर सीएसके आणि कोलकाता नाईट रायडर्स संघ आमने सामने होते. सीएसकेने हा सामना 77 धावांनी जिंकला आणि प्लेऑफचे टिकिट पक्के केले. हा सामना सुरू असताना सीएसकेचा फलंदाजी प्रशिक्षक माइक हसीने धोनीच्या फिटनेसविषयी महत्वाची माहिती दिली. धोनीला दुखापतीमुळे नीट धावताना येत नाहीये, अशी माहिती हसीने दिली.
दिल्ली कॅफिटल्सविरुद्धच्या सामन्यात एमएस धोनी (MS Dhoni) याने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. धोनीने घेतलेला हा निर्णय सीएसकेच्या फलंदाजांनी अगदी योग्य ठरवला. डेवॉन कॉनवे आणि ऋतुराज गायकवाड यांच्या वादळी खेळीमुळे सीएसकेने 20 षटकात 3 बाद 223 धावा केल्या. कॉनवेने 52 चेंडूत 87, तर ऋतुराजने 50 चेंडूत 79 धावांची खेळी केली. ऋतुराज गायकवाडनंतर शिवम दुबे याने 22 धावा करून विकेट गमावली. सीएसकेला दुबेच्या रूपात दुसरा झटका बसल्यानंतन धोनी चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. त्याने संघासाठी 4 चेंडूत 5* धावा केल्या. मागच्या काही सामन्यांपासून धोनी दुखापतीशी झगडत असल्याचे पाहाययला मिळाले होते. या सामन्यातही धोनीच्या फिटनेसवर चाहत्यांची नजर होती.
सीएसकेचा डाव संपल्यानंतर मायकल हसी (Michael Hussey) माध्यमांशी चर्चा करत होता. यावेळी त्याने धोनीची फिटनेस आणि गुडघ्याला झालेल्या दुखापतीवर मत मांडले. हसी म्हणाला, “एमएस धोनीचा गुडळा यावेळी 100 टक्के ठीक नाहीये. तो स्वतः कसाबसा सावरत आहे. शेवटच्या 2-3 षटकांमध्येच तो फलंदाजीसाठी येत आहे. धोनी आधीसारका धावूही शकत नाहीये. असे असले तरी, तो सर्व गोष्टी योग्य पद्धतीने पार पाडत आहे. धोनीची बॅटने चेंडू चांगला हिट करत आहे.”
सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर विजयासाठी मिळालेले 224 धावांचे लक्ष्य दिल्लीचे फलंदाज गाठू शकले नाहीत. दिल्ली कॅपिटल्सने 20 षटकांमध्ये 9 बाद 146 धावा केल्या आणि 77 धावांनी पराभव स्वीकारला. गोलंदाजी विभागात सीएसकेसाठी दीपक चाहरने सर्वाधिक 3, मथिशा पथिरानाने 2 आणि महिशा थिक्षाना याने 2 विकेट्स घेतल्या. तुषार देशपांडे आणि रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. (Big information from CSK coach on Dhoni’s fitness, CSK skipper is struggling to run)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दणदणीत विजयासह सीएसके थाटात प्ले ऑफ्समध्ये! दिल्लीची अखेरही पराभवाने
VIDEO: वॉर्नरने जडेजाची मजा घेत केले ‘तलवार सेलिब्रेशन’, DCvCSK सामन्यात घडला हंगामातील सर्वात फनी प्रसंग