बुधवारी (दि. 10 मे) चेन्नई सुपर किंग्स वि. दिल्ली कॅपिटल्स संघात आयपीएल 2023चा 55वा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडिअमवर खेळला गेला. या सामन्यात चेन्नईने 27 धावांनी दिल्लीला पराभवाचा धक्का दिला. चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 विकेट्स गमावत समाधानकारक 167 धावा केल्या होत्या. यावेळी दिल्लीकडून गोलंदाजी करताना मिचेल मार्श चमकला. त्याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. मात्र, त्याला फलंदाजीत खास कामगिरी करता आली नाही. मिचेल मार्श दुर्दैवीरीत्या धावबाद झाला. यादरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
सीएसकेने दिलेल्या 168 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना फलंदाजीला उतरलेल्या दिल्ली कॅपिटल्स संघाची सुरुवात खूपच खराब राहिली. पहिल्या षटकातच वेगवान गोलंदाज दीपक चाहर याने कर्णधार डेविड वॉर्नर (David Warner) याला शून्य धावेवर तंबूचा रस्ता दाखवला. तिसऱ्या षटकात पुन्हा चाहरने शानदार गोलंदाजी करत फिलिप सॉल्टला पव्हेलियनमध्ये पाठवले. तसेच, मनीष पांडे याने चाहरच्या पुढच्या षटकातील पहिल्या चेंडूचा सामना केला.
मनीषने बॅक ऑफ लेंथ चेंडू हलक्या हातांनी कव्हरच्या दिशेने मारला. यानंतर त्याने दुसऱ्या बाजूला असलेल्या मिचेल मार्श याला धाव घेण्याचा इशारा दिला. मात्र, यादरम्यान शॉर्ट कव्हरवर उभ्या असलेल्या अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याने वेगान चेंडू पकडला. मनीष दोन पाऊलेच पुढे आल्यानंतर त्याने धाव घेण्यास नकार दिला. मात्र, तोपर्यंत मार्श खूप पुढे आला होता. अशात रहाणेने चेंडू फेकण्याऐवजी स्टंप्सजवळ जाऊन धावबाद करण्याची संधी जाऊ दिली नाही.
Yes!
No!
Mix-up!
… and @ChennaiIPL cash in! 👌 👌
Mitchell Marsh is run-out!
Follow the match ▶️ https://t.co/soUtpXQjCX#TATAIPL | #CSKvDC pic.twitter.com/DCrCojcKL5
— IndianPremierLeague (@IPL) May 10, 2023
मार्श खेळपट्टीच्या मध्येच राहिला उभा
मार्श पव्हेलियनमध्ये परतण्यासोबतच दिल्लीने 3 विकेट्स अवघ्या 27 धावांच्या आत गमावले. पुढच्याच षटकात दिल्लाने 15 धावा काढल्या. अशाप्रकारे दिल्ली संघ पॉवरप्ले संपल्यानंतर धावफलकावर 3 बाद 47 धावा लावण्यात यशस्वी राहिला. विशेष म्हणजे, दिल्ली संघ आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेत पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक विकेट्स गमावणारा संघ आहे. त्यांनी आतापर्यंत सर्वाधिक 25 विकेट्स गमावले आहेत.
पॉवरप्लेमध्ये या हंगामात सर्वाधिक विकेट्स गमावणारे संघ
25 विकेट्स- दिल्ली कॅपिटल्स
23 विकेट्स- कोलकाता नाईट रायडर्स
21 विकेट्स- पंजाब किंग्स
मिचेल मार्श बाद झाल्यानंतर मनीष पांडे आणि रायली रुसो यांच्यात सामन्यातील सर्वोच्च 59 धावांची भागीदारी झाली. मात्र, दिल्लीने 20 षटकांनंतर 140 धावाच केल्या. त्यामुळे दिल्लीला हा सामना 27 धावांनी गमवावा लागला. दिल्लीचा पुढील सामना 13 मे रोजी पंजाब किंग्स संघाविरुद्ध आहे. (big mix up in the middle between manish pandey and mitchell marsh and the latter is run out see video here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘आम्ही पॉवरप्लेमध्येच हारलो, आमचे फलंदाज दुर्दैवी…’, CSKकडून दारुण पराभव होताच वॉर्नरचे मोठे भाष्य
आधीच खराब फॉर्म, त्यात विंडीजचा दिग्गज रोहितला म्हणतोय, ‘तू WTC फायनल खेळूच नको…’