भारतात होणाऱ्या आगामी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेसाठी गल्ली ते दिल्लीच काय, तर जगभरातील क्रिकेटप्रेमी उत्सुक झाले आहेत. या स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. अशातच विश्वचषकासाठी भारतीय संघाची नवीन जर्सी लाँच करण्यात आली आहे. भारतीय संघाचा अधिकृत किट स्पॉन्सर असलेल्या आदिदास या कंपनीने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओद्वारे त्यांनी भारतीय संघाची जर्सी लाँच केली आहे. भारतीय संघाची नवीन जर्सी पाहून चाहतेही खुश झाले आहेत. या नव्या जर्सीत कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली याच्यासह संपूर्ण संघाचा वेगळाच स्वॅग पाहायला मिळत आहे.
आदिदास (Adidas) कंपनीने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरुन जर्सी लाँच केली आहे. आदिदासने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात भारताचा प्रसिद्ध गायक रफ्तार याने ‘3 का ड्रीम’ (3 Ka Dream) हे गाणे गायले आहे. या गाण्यावर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma), विराट कोहली (Virat Kohli), शुबमन गिल, हार्दिक पंड्या आणि मोहम्मद सिराज यांसारखे स्टार खेळाडू नवीन जर्सीत दिसत आहेत.
https://www.instagram.com/reel/CxZ8ctWo_cP/?utm_source=ig_embed&ig_rid=574dc333-dca6-4ec9-94e8-4dc8e6349a51
भारतीय संघाचे कोट्यवधी चाहते भारतीय संघाच्या या तिसऱ्या वनडे विश्वचषक किताबाची वाट पाहत आहेत. या तिसऱ्या किताबाची प्रतीक्षा लक्षात घेऊनच ‘3 का ड्रीम’ हे गाणे बनवले गेले आहे.
जर्सीत बदल
आदिदास कंपनीने भारतीय संघासाठी जी जर्सी बनवली आहे, ती खूपच आकर्षक आहे. भारतीय संघाची वर्तमानातील जर्सीपेक्षा या नव्या जर्सीमध्ये खूप बदल करण्यात आले आहेत. नवीन जर्सीत खांद्यावर तीन पांढऱ्या पट्ट्यांच्या जागी कंपनीने भारतीय ध्वजातील तीन रंग (केशरी, पांढरा आणि हिरवा) ठेवले आहेत. तसेच, जर्सीच्या छातीच्या उजवीकडे बीसीसीआयचा लोगो आणि दोन स्टारही आहेत. हे दोन स्टार भारतीय संघाचा दोन वनडे विश्वचषक 1983 आणि 2011चा विजय दर्शवतात.
खरं तर, येत्या 5 ऑक्टोबरपासून क्रिकेटच्या महाकुंभमेळ्याला सुरुवात होत आहे. या विश्वचषकातील अभियानाची सुरुवात भारतीय संघ 8 ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध चेन्नई येथे करणार आहे. (big news adidas unveils indian team jersey for world cup 2023)
हेही वाचाच-
सिराजची गरुडझेप! ODI रँकिंगमध्ये ‘एवढ्या’ स्थानांचा फायदा घेत बनला Topper, Asia Cup 2023नंतर मोठा बदल
Dil Jashn Bole: World Cup 2023चे अँथेम साँग रिलीज; रणवीरची हवा, पण गाण्यात नाही एकही क्रिकेटर