भारतीय संघाचा स्टार खेळाडू अंबाती रायुडू आता परदेशात आपल्या फलंदाजीचा जलवा दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे. अंबाती रायुडू सीपीएल 2023 स्पर्धेत सेंट किट्स अँड नेविस पॅट्रियट्स संघाचा भाग आहे. विशेष म्हणजे, सीपीएलमध्ये खेळणारा तो प्रवीण तांबे याच्यानंतर दुसरा भारतीय खेळाडू बनला आहे. विशेष म्हणजे, पहिल्या सामन्यात तो शून्यावर तंबूत परतला होता. मात्र, दुसऱ्या सामन्यात रायुडूने षटकार मारत खास विक्रम आपल्या नावावर केला आहे. त्याच्या षटकाराचा व्हिडिओही सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
गुरुवारी (दि. 24 ऑगस्ट) सीपीएल 2023 (CPL 2023) स्पर्धेतील 8वा सामना सेंट किट्स अँड नेविस पॅट्रियट्स विरुद्ध गयाना ऍमेझॉन वॉरियर्स संघात खेळला गेला. हा सामना वॉरियर्स संघाने 65 धावांनी जिंकला. या सामन्यात वॉरियर्स संघाने नाणेफेक गमावत प्रथम फलंदाजी केली. यावेळी त्यांनी शाय होप (54) याच्या अर्धशतकाच्या जोरावर निर्धारित 20 षटकात 197 धावांचा डोंगर उभारला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना सेंट किट्स संघाचा डाव पत्त्यांच्या बंगल्यासारखा ढासळला. त्यांना 16.5 षटकात सर्व विकेट्स गमावत फक्त 132 धावाच करता आल्या. त्यामुळे हा सामना वॉरियर्स संघाने 65 धावांनी नावावर केला. असे असले, तरीही अंबाती रायुडू सीपीएल 2023 (Ambati Rayudu CPL 2023) स्पर्धेत खास विक्रम करण्यात यशस्वी झाला.
अंबाती रायुडूचा विक्रम
रायुडूने संघ अडचणीत असताना 32 धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली. त्याने ही खेळी साकारताना 24 चेंडूंचा सामना करत 2 चौकार आणि 2 षटकारही मारले. विशेष म्हणजे, रायुडूने स्पर्धेत पहिला षटकार मारताच तो सीपीएल स्पर्धेत षटकार मारणारा पहिला भारतीय फलंदाज बनला. आता त्याच्या षटकाराचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.
Ambati Rayudu's first six in CPL.
He becomes the first Indian player to hit a six in CPL.pic.twitter.com/4mTt8vu6Rk
— Johns. (@CricCrazyJohns) August 26, 2023
पहिल्या सामन्यात शून्यावर झालेला बाद
अंबाती रायुडू याचा पदार्पणाच्या सामन्यात पावसाने व्यत्यय आणला होता. पहिल्या सामन्यात जमैका तलावाह संघाविरुद्ध खेळताना तो अपयशी ठरला होता. त्याला 3 चेंडू खेळून खातेही न खोलता तंबूचा रस्ता धरावा लागला होता. मात्र, दुसऱ्या सामन्यात रायुडूने शानदार फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. (big news Ambati Rayudu’s first six in CPL He becomes the first Indian player to hit a six in CPL)
हेही वाचा-
ना विराट, ना गिल! World Cup 2023मध्ये ‘हा’ भारतीय धुरंधर ठोकणार सर्वाधिक धावा, सेहवागची भविष्यवाणी
कशी नशिबाने थट्टा आज मांडली! भारताच्या ‘या’ खेळाडूचे करिअर बर्बाद? 2 वर्षांपासून खेळला नाही सामना