आशिया चषक 2023 स्पर्धा अवघ्या 3 दिवसांवर येऊन ठेपली आहे. या स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वीच बांगलादेश क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा स्टार सलामीवीर फलंदाज लिटन दास याला ताप आला आहे. त्यामुळे तो आता संघासोबत आज श्रीलंकेला जाऊ शकणार नाही. तो सोमवारी (दि. 28 ऑगस्ट) श्रीलंकेला जाईल. अशी माहिती, बांगलादेश प्रीमिअर लीगमधील बांगला टायगर्स संघाच्या सोशल मीडिया मॅनेजरने दिली आहे. (big news asia cup 2023 litton das misses sri lanka flight due to illness)
बांगलादेश प्रीमिअर लीगमधील बांगला टायगर्स संघाचा सोशल मीडिया मॅनेजर सैफ अहमद याने ट्वीट (एक्स) केले. त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, “लिटन दास हा आजारी आहे. त्यामुळे त्याला संघासोबत आशिया चषकासाठी प्रवास करता येणार नाही. अशात तो सोमवारी एकटा प्रवास करेल.”
🚨 Litton Das is sick. He couldn’t travel with the team today for Asia Cup. He’ll travel alone on Monday.#AsiaCup2023 pic.twitter.com/1D2mgn9cdu
— Saif Ahmed 🇧🇩 (@saifahmed75) August 27, 2023
माध्यमांशी बोलताना, बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या क्रिकेट संचालन समितीचे अध्यक्ष जलाल युनूस यांनी रविवारी (दि. 27 ऑगस्ट) यांनी लिटन दास (Litton Das) याच्या अनुपस्थितीची पुष्टी केली. ते म्हणाले की, “लिटनला ताप आला आहे. त्याची डेंग्यू टेस्ट नकारात्मक आली आहे. त्यामुळे जर तो लवकर बरा झाला, तर तो श्रीलंकेला पुढील फ्लाईटने जाईल. मात्र, जर तो बरा झाला नाही, तर आम्हाला त्याच्या बदली खेळाडूबाबत विचार करावा लागू शकतो.”
तंजीम हसन साकिब घेऊ शकला नाही भरारी
विशेष म्हणजे, बांगलादेश संघ 27 ऑगस्ट रोजी ढाकाहून श्रीलंकेला रवाना झाला. इबादत हुसेन याच्या बदली खेळाडूच्या रूपात संघात सामील झालेला युवा वेगवान गोलंदाज तंजीम हसन साकिब (Tanzim Hasan Sakib) हादेखील भरारी घेऊ शकला नाही. तो नंतर श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाईल. कारण, त्याचे तिकीट अद्याप निश्चित झाले नाहीये.
बांगलादेशचे आशिया चषकातील अभियान कधी होणार सुरू?
आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) स्पर्धेला 30 ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. ही स्पर्धा श्रीलंका आणि पाकिस्तान संघ यजमानपद भूषवत आहेत. बांगलादेश संघाचे आशिया चषकातील अभियान 31 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. बांगलादेश संघ कँडीच्या पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडिअममध्ये गतविजेत्या श्रीलंका संघाविरुद्ध खेळणार आहे. यानंतर बांगलादेश 3 सप्टेंबर रोजी गद्दाफी स्टेडिअममध्ये आपल्या गटातील अखेरचा साखळी सामना अफगाणिस्तानविरुद्ध खेळेल. (big news asia cup 2023 litton das misses sri lanka flight due to illness)
हेही वाचा-
हेडनने निवडली वर्ल्डकपसाठी टीम इंडिया! सॅमसनला संधी तर, हुकमी एक्का केला बाहेर
व्हिडिओ: महिला चाहतीने धोनीच्या पायांना केला स्पर्श, ‘माही’ची मन जिंकणारी कृती कॅमेऱ्यात कैद