क्रिकेटविश्वातून मोठी बातमी समोर येत आहे. यावर्षी 7 ते 11 जून दरम्यान जागतिक कसोटी अजिंक्यपद 2023 स्पर्धेचा अंतिम सामना लंडनमध्ये खेळला जाणार आहे. यापूर्वीच ऑस्ट्रेलिया संघाने डब्ल्यूटीसी आणि इंग्लंडविरुद्धच्या ऍशेज मालिकेसाठी 17 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे, यात अनेक दिग्गज खेळाडूंना सामील करण्यात आले आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने बुधवारी (दि. 19 एप्रिल) सकाळी 17 सदस्यीय संघाची घोषणा केली. वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स याच्याकडे संघाचे नेतृत्व आहे. तसेच, अष्टपैलू मिचेल मार्श (Mitchell Marsh) याचे 4 वर्षांनंतर कसोटी संघात पुनरागमन झाले आहे. त्याने अखेरचा कसोटी सामना 2019मध्ये खेळला होता. मागील काही दिवसांपूर्वी भारत दौऱ्यात मार्शने वनडे मालिकेत वादळी फलंदाजी केली होती. जागतिक कसोटी अजिंक्यपद (World Test Championship) स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी घोषित संघ इंग्लंडविरुद्ध ऍशेज मालिकेतील पहिल्या दोन सामन्यातही उतरणार आहे. शेवटच्या 3 कसोटींसाठी संघाची घोषणा नंतर केली जाईल.
Thoughts on the squad Australia are taking to the UK? #Ashes #WTCFinal pic.twitter.com/W1cKaY51PW
— cricket.com.au (@cricketcomau) April 19, 2023
मार्शव्यतिरिक्त मार्कस हॅरिस आणि जोश इंग्लिस यांचेही संघात पुनरागमन झाले आहे. 17 सदस्यीय संघात शेफील्ड शील्डमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या कॅमरून ग्रीन (Cameron Green) याला आणि स्कॉट बोलँड यालाही संघात घेतले आहे. तो या स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणारा दुसरा गोलंदाज होता. विशेष म्हणजे, सलामीवीर फलंदाज डेविड वॉर्नर यालाही संघात सामील करण्यात आले आहे.
हॅरिस याने व्हिक्टोरिया संघाकडून खेळताना शेफील्ड शील्डमध्ये 601 धावा केल्या होत्या. त्यात 2 शतकांचाही समावेश होता. तसेच, कॅमरून बॅनक्रॉफ्टने 59.06च्या सरासरीने 4 शतक ठोकत 945 धावा केल्या होत्या.
ऑस्ट्रेलिया संघात याव्यतिरिक्त स्टीव्ह स्मिथ, मार्नस लॅब्युशेन, उस्मान ख्वाजा आणि ट्रेविस हेड यांसारख्या दिग्गजांनाही स्थान मिळाले आहे. हेडने नुकतेच भारत दौऱ्यावर चांगली कामगिरी केली होती. भारताविरुद्ध शानदार कामगिरी करणाऱ्या पीटर हँड्सकॉम्ब यालाही संघातून वगळण्यात आले आहे.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील डब्ल्यूटीसी अंतिम सामना 7 ते 11 जूनदरम्यान खेळला जाईल. तसेच, ऍशेज मालिकेला 20 जूनपासून सुरुवात होईल. (big news australia s squad for wtc final and ashes series announced see here)
डब्ल्यूटीसी अंतिम सामना आणि ऍशेज मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघ
पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलँड, ऍलेक्स कॅरे, कॅमरून ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेजलवूड, ट्रेविस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅब्युशेन, नेथन लायन, मिचेल मार्श, टॉड मर्फी, मॅट रेनशॉ, स्टीव्ह स्मिथ (उपकर्णधार), मिचेल स्टार्क आणि डेविड वॉर्नर.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ग्रीनच्या ‘ऑलराऊंड’ कामगिरीने मुंबईची विजयाची हॅट्रिक! अखेरच्या षटकात अर्जुन तेंडुलकरचा तिखट मारा
धोनी होणार आयपीएलमध्ये 2023 मध्ये सस्पेंड? या कारणाने होऊ शकते कारवाई