क्रिकेटटॉप बातम्या

मोठी बातमी! महिला आशिया चषकासाठी भारतीय ‘अ’ संघाची घोषणा, विश्वचषक गाजवणाऱ्या रणरागिनीकडे नेतृत्व

क्रिकेटजगतातून मोठी बातमी समोर येत आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने महिला आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय ‘अ’ संघ घोषित केला आहे. ही घोषणा बीसीसीआयने शुक्रवारी (दि. 2 जून) केली आहे. महिला आशिया चषक 2023 स्पर्धा 12 ते 21 जूनदरम्यान खेळली जाणार आहे. 19 वर्षांखालील विश्वविजेत्या महिला भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणारी श्वेता सेहरावत हिच्यावर कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तिच्याव्यतिरिक्त अनेक खेळाडूंना संघात स्थान मिळाले आहे.

श्वेता सेहरावत (Shweta Sehrawat) एसीसी इमर्जिंग महिला आशिया चषक (ACC Emerging Women Asia Cup 2023) स्पर्धेत 14 सदस्यीय भारतीय संघाची कर्णधार असेल. भारतीय ‘अ’ संघ 13 जून रोजी हाँगकाँगविरुद्ध आपला पहिला सामना खेळेल. बीसीसीआयने शुक्रवारीच संघाची घोषणा केली होती. भारतीय संघ ‘अ’ गटात हाँगकाँग ‘अ’, थायलंड ‘अ’, पाकिस्तान ‘अ’ या संघांसोबत आहे, तर बांगलादेश ‘अ’, श्रीलंका ‘अ’, मलेशिया ‘अ’ आणि यूएई ‘अ’ हे संघ ‘ब’ गटात आहेत.

पार्शवी चोप्रा आणि सौम्या तिवारीचाही संघात समावेश
बीसीसीआयने माजी अष्टपैलू नूशिन अल खदीर यांना मुख्य प्रशिक्षक म्हणून निवडले आहे. खदीर यांनी जानेवारी महिन्यात 19 वर्षांखालील स्पर्धेदरम्यान बॅकरूम स्टाफचे नेतृत्व केले होते. तसेच, त्या मार्च महिन्यात महिला प्रीमिअर लीग स्पर्धेत गुजरात जायंट्स संघाचे सहाय्यक प्रशिक्षकही होत्या. दुसरीकडे, संघात श्वेतासोबत सौम्या तिवारी, जी त्रिशा, तितास साधू, पार्शवी चोप्रा आणि मन्नत कश्यप यांसारख्या खेळाडूही आहेत.

खरं तर, श्वेताने 19 वर्षांखालील महिला टी20 विश्वचषकात 7 डावात 297 धावा करून सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये अव्वलस्थान पटकावले होते. तसेच, 17 वर्षीय पार्शवी डब्ल्यूपीएल (WPL) स्पर्धेत सर्वात कमी वयाच्या खेळाडूंपैकी एक होती, जिने 6 डावात 11 विकेट्स घेतल्या होत्या. त्या स्पर्धेत ती दुसरी सर्वाधिक विकेट्स घेणारी गोलंदाज होती.

महिला आशिया चषकासाठी भारतीय संघ
श्वेता सेहरावत (कर्णधार), सौम्या तिवारी, तृषा गोंगाडी, मुस्कान मलिक, श्रेयांका पाटील, कनिका आहूजा, उमा छेत्री, ममता मडीवाला, तितास संधू, यशश्री एस, काशवी गौतम, पा‌र्शवी चोप्रा, मन्नत कश्यप, बी अनुषा (big news bcci announces india a squad for acc emerging women asia cup 2023 shweta sehrawat read here)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वेस्ट इंडीज क्रिकेटची नवी शोधमोहीम! माजी दिग्गजाने सांभाळलेल्या महत्वाच्या पदाचा कार्यकाळ संपला
शार्दुल ठाकूर आणि हिटमॅनच्या पत्नीत होऊ शकतात भांडणं! सोशल मीडिया पोस्ट ठरणार कारणीभूत?

Related Articles