भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. डिझ्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी स्ट्रीमिंग कंपनीने मोठी घोषणा केली आहे. या घोषणेने भारतीय चाहते नक्कीच खुश होणार आहेत. त्यांनी अशी घोषणा केली आहे की, भारतात होणाऱ्या मोठ्या स्पर्धांचे मोफत स्ट्रीमिंग केले जाईल. हॉटस्टार मोबाईल युजर्ससाठी आशिया चषक 2023 आणि वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या आयसीसी वनडे विश्वचषक स्पर्धेचे स्ट्रीमिंग मोफत करणार आहे.
क्रिकेट प्रेक्षकांना आकर्षित करण्याचे लक्ष्य
डिझ्नी प्लस हॉटस्टार (Disney Plus Hotstar) कंपनीने हा निर्णय जिओ सिनेमा (Jio Cinema) यांच्या पावलांवर पाऊल टाकत घेतला आहे. कंपनीला या मोफत स्ट्रीमिंगमुळे अधिकाधिक क्रिकेटप्रेमींना आपल्याकडे आकर्षित करायचे आहे. हॉटस्टार कंपनीने या वर्षाच्या सुरुवातीला रिलायन्स इंडस्ट्रीजची ऍप जिओ सिनेमाविरुद्ध प्रतिष्ठित इंडियन प्रीमिअर लीग (Indian Premier League) स्पर्धेच्या स्ट्रीमिंगचे अधिकार गमावले होते.
हॉटस्टारचे युजर्स झाले कमी
संशोधन कंपनी सीएलएसएनुसार, हॉटस्टारने आयपीएल अधिकार गमावल्यानंतर त्यांचे 50 लाख युजर्स कमी झाले आहेत. कंपनीने दावा केला आहे की, यामुळे 54 कोटी युजर्सला फायदा होईल. खरं तर, आयपीएल (IPL) स्पर्धेचे अधिकार जिओ सिनेमाविरुद्ध आयपीएल अधिकार गमावल्यामुळे अनेक लोकांनी हॉटस्टार सबस्क्रिप्शन रिन्यू केले नव्हते, याचा कंपनीला मोठा फटका बसला होता.
जिओ सिनेमाचे अनेक विक्रम
जिओ सिनेमाने आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धा युजर्ससाठी मोफत स्ट्रीम करण्याची घोषणा केली होती. यानंतर स्पर्धेच्या पहिल्या आठवड्यातच कंपनीने विक्रमी 1.47 बिलियन डिजिटल व्ह्यूजची नोंद केली होती. जिओने आयपीएल 2023 हंगामात गुजरात टायटन्स वि. चेन्नई सुपर किंग्स संघातील अंतिम सामन्यात विक्रमी 3.2 कोटी व्ह्यूअरशिप मिळवली होती, जो लाईव्ह असल्यामुळे स्पर्धेतील सर्वात मोठा विक्रम आहे.
जिओ आकारणार पैसे
यापूर्वी जिओने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर वि. चेन्नई सुपर किंग्स सामन्यातही विक्रमी व्ह्युअरशिप मिळवली होती. रिलायन्स मीडिया आणि कंटेंट बिझनेसच्या अध्यक्षा ज्योती देशपांडे यांनी एप्रिल महिन्यातील एका मुलाखतीत सांगितले होते की, जिओ सिनेमा आपल्या युजर्ससाठी आता पैसे आकारण्याची तयारी करत आहे. मात्र, आयपीएल स्ट्रीमिंग मोफत ठेवण्याची योजना आहे.
आता हॉटस्टारच्या मोफत स्ट्रीमिंगचा निर्णय त्यांच्यासाठी फायद्याचा ठरतो की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (big news disney plus hotstar provide free streaming of icc world cup 2023 and asia cup to mobile users)
महत्वाच्या बातम्या-
मिचेल स्टार्कचा जबरदस्त विक्रम! 600 विकेट्स घेताच नावावर झाला मोठा रेकॉर्ड
मागच्या 10 वर्षांपासून टीम इंडिया का जिंकत नाहीये आयसीसी ट्रॉफी? हरभजन सिंगने स्पष्टच सांगितलं