आगामी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेचे महत्त्व लक्षात घेऊन अनेक संघ वनडे मालिका खेळून स्पर्धेची तयारी करत आहेत. सध्या न्यूझीलंड क्रिकेट संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात उभय संघात 4 सामन्यांची टी20 आणि वनडे मालिका खेळली जात आहे. टी20 मालिका पार पडली असून आता वनडे मालिकेतला सुरुवात झाली आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात न्यूझीलंडला विजय मिळवण्यात यश आले आहे. मात्र, त्यांच्यासाठी एक वाईट बातमी समोर येत आहे. संघाचा स्टार वेगवान गोलंदाज ऍडम मिल्ने हा हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून बाहेर पडला आहे.
स्कॅनद्वारे झाली दुखापतीची पुष्टी
विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेपूर्वी न्यूझीलंड संघाच्या चिंतेत भर पडली आहे. न्यूझीलंडने यापूर्वी अस्थायी 15 सदस्यीय संघ निवडला आहे, ज्याची पुष्टी सोमवारी (दि. 11 सप्टेंबर) एका कार्यक्रमात केली जाईल. मात्र, 28 सप्टेंबरपर्यंत यामध्ये बदल करण्याची शक्यता आहे. ऍडम मिल्ने (Adam Milne) याच्या दुखापतीबाबत स्कॅनद्वारे समजले आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, सामन्याच्या एक दिवस आधी सरावादरम्यान त्याच्या शरीरात मांसपेशी ताणल्या गेल्याचे त्याला जाणवले. यानंतर त्याचे स्कॅन करण्यात आले. विशेष म्हणजे, न्यूझीलंडला या महिन्याच्या अखेरीस तीन सामन्यांच्या मालिकेसाठी बांगलादेशचाही दौरा करायचा आहे.
New Zealand dealt with an injury blow in their ongoing ODI series against England.#ENGvNZ | Details 👇 https://t.co/Qq7J9V1LGm
— ICC (@ICC) September 9, 2023
कुणाला मिळाली संधी?
मिल्ने बाहेर पडल्यामुळे डावखुरा वेगवान गोलंदाज बेन लिस्टर याला इंग्लंडविरुद्धच्या पुढील 3 वनडे सामन्यांसाठी ताफ्यात सामील करण्यात आले आहे. न्यूझीलंड संघाचे प्रशिक्षक गॅरी स्टीड म्हणाले, “आमच्याकडे या सामन्यांमध्ये कमी बदल आहेत. आम्हाला आगामी विश्वचषकासाठी खेळाडूंची काळजी घ्यायची आहे. बेन आधीपासूनच इंग्लंडमध्ये आहे. बेनने आम्हाला यूएई आणि इंग्लंडमध्ये सराव सामन्यात प्रभावित केले.”
Squad News | Adam Milne has been ruled out of the remainder of the BLACKCAPS ODI Series in England with a low grade hamstring injury. Milne's injury means left-armer Ben Lister will now join the squad in Southampton today. #ENGvNZ https://t.co/eKNVKXNb78
— BLACKCAPS (@BLACKCAPS) September 9, 2023
लिस्टरची कामगिरी
बेन लिस्टर हा 27 वर्षीय असून त्याने या वर्षीच्या सुरुवातीला पाकिस्तानविरुद्ध वनडे पदार्पण केले होते. त्याने आतापर्यंत 10 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. मात्र, तो बांगलादेश दौऱ्यासाठी संघाचा भाग नाहीये. त्याला न्यूझीलंड संघाच्या विश्वचषक संघाचाही दावेदार मानले जात नाहीये. खरं तर, न्यूझीलंडने शुक्रवारी (दि. 08 सप्टेंबर) इंग्लंडच्या कार्डिफ येथे खेळलेल्या पहिल्या वनडेत विजय मिळवत मालिकेत 1-0ने आघाडी घेतली आहे. (big news eng vs nz adam milne ruled out of odi series ben lister called in)
हेही वाचाच-
ऍडम झंपा ठरला स्टार! चार विकेट्स घेत ऑस्ट्रेलियासाठी जिंकला सामना, मालिकाही केली नावावर
ASIA CUP: श्रीलंकेचा विजयरथ सुसाट! सलग 13 व्या वनडेत मारले मैदान, बांगलादेशचे आव्हान संपुष्टात