वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर क्रिकेटविश्वातून मोठी बातमी समोर येत आहे. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने मोठे पाऊल उचलले आहे. बोर्डाने घोषणा करत अनेक दिग्गजांना सपोर्ट स्टाफमध्ये सामील केले आहे. हे माजी दिग्गज खेळाडू भारतात होणाऱ्या आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेसह परदेशातील अनेक दौऱ्यांवर संघासोबत असतील. बोर्डाच्या या निर्णयामुळे संघाची ताकद वाढणार आहे.
न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने इंग्लंडचा माजी फलंदाज इयान बेल (Ian Bell), इंग्लंडचाच माजी यष्टीरक्षक जेम्स फोस्टर (James Foster), आपल्याच देशाचे माजी कर्णधार स्टीफन फ्लेमिंग (Stephen Fleming) आणि पाकिस्तानचे माजी फिरकीपटू सकलेन मुश्ताक (Saqlain Mushtaq) यांना सपोर्ट स्टाफमध्ये सामील केले आहे.
हे दिग्गज खेळाडू पुढील काही महिन्यांमध्ये परदेशातील दौऱ्यांवर संघाच्या सपोर्ट स्टाफचा भाग असतील. 2020पासून प्रशिक्षणाच्या दुनियेत पाऊल ठेवणारा ऍशेस विजेता इयान बेल 30 ऑगस्ट रोजी आपल्याच देशाविरुद्ध सुरू होत असलेल्या टी20 मालिकेत सहाय्यक प्रशिक्षक असेल. तो विश्वचषकाची तयारी करण्यासाठी इंग्लंड आणि बांगलादेशविरुद्धच्या वनडे सामन्यांसाठी ल्यूक रोंची यांच्या जागी फलंदाजी प्रशिक्षकाची भूमिका निभावेल. गॅरी स्टीड यांच्या नेतृत्वात ल्यूक रोंची आणि शेन जुर्गेंसन विश्वचषकासाठी उपस्थित असतील.
Former England internationals @Ian_Bell and @JamesFoster07 have been enlisted to the BLACKCAPS coaching ranks, while @Saqlain_Mushtaq and @SPFleming7 will also feature in the coming four months of continual touring. #ENGvNZ #BANvNZ #CWC23 https://t.co/VWOOBgVMZC
— BLACKCAPS (@BLACKCAPS) August 22, 2023
इंग्लंडचा माजी यष्टीरक्षक फलंदाज जेम्स फोस्टर इंग्लंडविरुद्ध वनडे मालिकेसोबतच विश्वचषकासाठीही सहाय्यक प्रशिक्षकाच्या रूपात काम करेल. चेन्नई सुपर किंग्स संघाचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग इंग्लंडविरुद्धच्या वनडे सामन्यांदरम्यान न्यूझीलंडच्या ताफ्यात प्रशिक्षक म्हणून दुसऱ्यांदा काम करतील. तसेच, पाकिस्तानचे माजी फिरकीपटू सकलेन मुश्ताक विश्वचषकानंतर बांगलादेशमध्ये कसोटी मालिकेदरम्यान संघाची मदत करतील.
New Zealand have bolstered their coaching staff ahead of the @cricketworldcup 🏆
Details ➡️ https://t.co/8CEbceAUt7 pic.twitter.com/2E0E3Mz7qh
— ICC (@ICC) August 23, 2023
काय म्हणाले संघाचे मॅनेजर?
न्यूझीलंड संघाचे मॅनेजर सिमोन इन्सली म्हणाले की, “सध्या मोठ्या प्रमाणात खेळले जात असलेल्या क्रिकेटकडे पाहता आमच्या खेळाडूंचं आणि सपोर्ट स्टाफचं भलं महत्त्वाचं आहे. टी20 संघ यूएईला (12 ऑगस्ट) रवाना झाल्यानंतर संघ 16 सप्टेंबरपर्यंत क्रिकेट खेळेल. तसेच, वर्षाच्या अखेरीस कसोटी संघ मायदेशातील व्यस्त उन्हाळी हंगामात आपल्या देशात परतेल.”
असे माजी दिग्गज खेळाडू सपोर्ट स्टाफमध्ये आल्यामुळे न्यूझीलंड क्रिकेटची ताकद नक्कीच वाढेल, यात कोणतीही शंका नाही. (big news ian bell stephen fleming and saqlain mushtaq to join new zealand coaching group on away tours)
हेही वाचा-
‘त्याच्याबद्दल बोलूच नका…’, Asia Cupसाठी संघात न घेतलेल्या अश्विनबद्दल ‘हे’ काय बोलून गेले गावसकर
Asia Cup 2023पूर्वी ‘या’ संघाला धक्का! हुकमी एक्का दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर, 20 वर्षीय पठ्ठ्याची एन्ट्री