आशिया चषक 2023 स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (दि. 17 सप्टेंबर) कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडिअमवर भारत विरुद्ध श्रीलंका संघात खेळला जाणार आहे. या सामन्याकडे सर्व क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे. मात्र, या सामन्यापूर्वी श्रीलंका क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. श्रीलंकेचा स्टार फिरकीपटू महीश थीक्षणा याच्या मांसपेशी ताणल्या गेल्यामुळे तो भारताविरुद्ध खेळणार नसल्याचे वृत्त समोर येत आहे. थीक्षणाच्या दुखापतीच्या गंभीरतेबाबत स्कॅननंतरच कळेल.
कसा झाला दुखापतग्रस्त?
श्रीलंकेचा स्टार फिरकीपटू महीश थीक्षणा (Maheesh Theekshana) आशिया चषक 2023 (Asia Cup 2023 Final) स्पर्धेच्या अंतिम सामन्यातून बाहेर होणे श्रीलंकेसाठी मोठा धक्का मानले जात आहे. खरं तर, गुरुवारी (दि. 14 सप्टेंबर) पाकिस्ताv विरुद्ध श्रीलंका संघात आशिया चषक सुपर- 4 फेरीतील पाचवा सामना खेळला गेला. या सामन्यादरम्यान क्षेत्ररक्षण करताना थीक्षणाच्या उजव्या हॅमस्ट्रिंग (पायाच्या मांसपेशी) ताणल्या गेल्या.
Maheesh Theekshana ruled out of Asia Cup 2023 Final. pic.twitter.com/OguKzWlIKJ
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 16, 2023
श्रीलंका क्रिकेटने गुरुवारी ट्विटर (एक्स) माध्यमाद्वारे पोस्ट शेअर केली की, “महीश थीक्षणा याच्या मांसपेशी ताणल्या गेल्या आहेत. खेळाडूच्या स्थितीचे पूर्णपणे आकलन करण्यासाठी त्याचे स्कॅन केले जाईल.”
🚨 Maheesh Theekshana has strained his right hamstring.
The player will undergo a scan tomorrow to fully assess his condition.
Theekshana sustained the injury while he was fielding during the ongoing game between Sri Lanka and Pakistan.#AsiaCup2023 #SLvPAK pic.twitter.com/6RTSRxhKNQ
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) September 14, 2023
या सामन्यात श्रीलंका संघाच्या गोलंदाजीदरम्यान थीक्षणा अनेकदा लंगडत चालताना आणि मैदानाबाहेर जाताना दिसला. महीश थीक्षणा दुखापतग्रस्त (Maheesh Theekshana Injured) असूनही त्याने 42व्या षटकांच्या सामन्यातील आपली 9 षटके पूर्ण केली. तो पाकिस्तानच्या डावादरम्यान 39व्या षटकात संघसहकाऱ्यांच्या मदतीने मैदानाबाहेर झाला.
थीक्षणाची स्पर्धेतील कामगिरी
थीक्षणाने या स्पर्धेत आतापर्यंत 5 सामने खेळताना 29.12च्या सरासरीने 8 विकेट्स घेतल्या आहेत. तो स्पर्धेत श्रीलंकेकडून सर्वाधिक विकेट्स घेणारा तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आहे. यादीत पहिल्या स्थानी मथीशा पथिराना (11 विकेट्स) आणि दुसऱ्या स्थानी दुनिथ वेललागे (10 विकेट्स) आहेत.
‘हे’ खेळाडूही आधीच संघातून बाहेर
थीक्षणाच्या दुखापतीने श्रीलंका संघाच्या चिंतेत भर घातली आहे. कारण, यापूर्वी वनिंदू हसरंगा, दुश्मंत चमीरा, लाहिरू मदुशंका आणि लाहिरू कुमारा यांसारखे खेळाडू दुखापतीमुळे संघाबाहेर आहेत. आता श्रीलंका संघ रविवारी भारताविरुद्ध दोन हात करणार आहे. (ind vs sl asia cup 2023 final big news about sri lanka before final against india maheesh theekshana injured read)
हेही वाचा-
क्लासेनच्या वादळात ऑस्ट्रेलिया उद्ध्वस्त! 13 सिक्स आणि 13 फोर मारत केला ‘हा’ जबरा Record, लगेच वाचा
दक्षिण आफ्रिकेचा कहर! ऑस्ट्रेलियाविरुद्ध बनवला World Record, वनडेतील अखेरच्या 10 षटकात चोपल्या ‘एवढ्या’ धावा