भारतीय पुरुष फुटबॉल संघाने 140 कोटींहून अधिक भारतीयांची मान अभिमानाने उंचावणारी कामगिरी केली आहे. खरं तर, भारताने इतिहास रचला आहे. भारताने जागतिक फुटबॉलमध्ये सर्वोत्तम क्रमवारी मिळवली आहे. नुकतेच फिफाने ताजी क्रमवारी जाहीर केली. फिफा जागतिक क्रमवारीत भारतीय संघाने 100वे स्थान मिळवले आहे. ही भारतीय फुटबॉल संघाची आतापर्यंतची सर्वोत्तम क्रमवारी आहे.
फिफा जागतिक क्रमवारी (FIFA World Rankings) जाहीर होताच भारतीय फुटबॉल संघासाठी (Indian Football Team) आनंदाची बातमी मिळाली. भारताने 101 स्थानावरून लेबनन आणि न्यूझीलंड या बलाढ्य देशांना पछाडत 100वे स्थान पटकावले. जागतिक क्रमवारीत अव्वल 100 संघांमध्ये सामील होण्याची भारताची ही पहिलीच वेळ आहे. 15 मार्च, 2018पासून ते 99व्या स्थानी होते. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक इगोर स्टिमॅक यांच्या शिरपेचात हा मानाचा तुरा आहे.
फिफा विश्वचषक 2022 (FIFA World Cup 2022) विजेत्या अर्जेंटिना संघाने क्रमवारीतील आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. अर्जेंटिनाने यावेळी फ्रान्सला पछाडले आहे. फ्रान्स क्रमवारीत दुसऱ्या स्थानी आहे. तसेच, यूएसए संघही अव्वल 10 संघांच्या स्थानाजवळ पोहोचला आहे. अमेरिकेने 13वरून 11व्या स्थानी पोहोचला आहे.
भारतीय संघासाठी, गेल्या वर्षीच्या तुलनेत चार स्थानांची वाढ झाली असून, संघ प्रथमच एएफसी आशियाई चषकाच्या सलग दोन हंगामामध्ये भाग घेणार आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये व्हीएफएफ तिरंगी मालिकेत व्हिएतनामकडून 0-3 असा पराभव झाल्यापासून स्टिमॅक यांच्या प्रशिक्षणाखाली भारतीय पुरुषांनी अनेक सामन्यात यशस्वी कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे, 2023मध्ये आतापर्यंत दोन अनिर्णित आणि सात विजयांसह भारतीय संघ अपराजित राहिला आहेत.
गुवाहाटी येथील इंदिरा गांधी ऍथलेटिक स्टेडियमवर फिफा विश्वचषक पात्रता फेरीत भारताने ओमानविरुद्ध 1-2 असा शेवटचा पराभव पत्करला होता. त्यानंतर भारतीय संघाने घरच्या मैदानावर सुमारे चार वर्षे अपराजित राहून एक शानदार विक्रम केला आहे. भारताने यावर्षी मार्चमध्ये मणिपूर येथे तिरंगी मालिका आणि इंटरकॉन्टिंनेंटल चषक उंचावला. यामध्ये भारताने किर्गिझिस्तान आणि लेबनन यांच्याविरुद्ध सहज विजय नोंदवला होता.
भारतीय संघाने लेबननवर नुकत्याच मिळवलेल्या विजयानंतर फिफा जागतिक क्रमवारीत वाढ झाली आहे. भारतीय संघ 1 जुलै रोजी सॅफ चॅम्पियनशिप 2023 (SAFF Championship) स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात लेबननविरुद्ध दोन हात करेल. (big news India ranked 100 in FIFA Rankings: Indian Football in top 100 for the first time in five years)
फिफा क्रमवारी- 23 जून, 2023 (अव्वल 10)
1. अर्जेंटिना
2. फ्रान्स
3. ब्राझील
4. इंग्लंड
5. बेल्जियम
6. क्रोएशिया
7. नेदरलँड
8. इटली
9. पोर्तुगाल
10. स्पेन
महत्वाच्या बातम्या-
धक्कादायक! साळगावकर एफसी बंद करण्याचा निर्णय! भारतीय फुटबॉलमधील मानाच्या ट्रॉफी केलेल्या नावे, चाहते नाराज
SAFF CUP: ब्लू ब्रिगेडने उंचावली विजयी पताका! नेपाळला 2-0 ने केले पराभूत, छेत्रीचा पुन्हा गोल