---Advertisement---

इंटर कॉन्टिनेन्टल फुटबॉल कपमध्ये ‘ब्लू ब्रिगेड’ची विजयी सुरुवात! समद-छांगते ठरले विजयाचे शिल्पकार

On: शनिवार, जून 10, 2023 12:05 PM
---Advertisement---

भुवनेश्वर येथे सुरू असलेल्या इंटर कॉन्टिनेन्टल फुटबॉल कपमध्ये भारतीय पुरुष संघाने विजयी सुरुवात केली. मंगोलियाविरुद्ध झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने 2-0 असा विजय मिळवला. सहल अब्दुल समद व ललियानझुआला छांगते हे भारताच्या विजयाचे शिल्पकार ठरले.

भारतीय संघ प्रथमच ओडीसा येथील मैदानावर कोणत्याही प्रकारचा आंतरराष्ट्रीय सामना खेळत होता. या सामन्यात भारतीय संघाची सुरुवात धमाकेदार झाली. सहलने दुसऱ्याच मिनिटाला गोल झळकावत यजमान संघाला आघाडीवर नेले. त्यानंतर चौदाव्या मिनिटाला छांगते याने दुसरा गोल करत आघाडी वाढवली. उर्वरित वेळात दोन्ही संघांनी गोल करण्याचे प्रयत्न केले. मात्र, दोन्ही संघांना यामध्ये अपयश आले. अखेर भारतीय संघाने हा सामना आपल्या नावे केला. छांगते याला सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार देण्यात आला. ‌

त्यापूर्वी झालेल्या लेबनॉन विरुद्ध वनातू या सामन्यात लेबनॉनने 3-1 असा विजय संपादन केला. या स्पर्धेचे उद्घाटन ओडिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक व भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष कल्याण चौबे यांच्या हस्ते झाले. भारतीय संघ या स्पर्धेचा गतविजेता असून, ते आपल्या विजेतेपदाचा बचाव करण्याचा प्रयत्न करतील.

बातमी अपडेट होत आहे

(Indian Men’s Football Team Start With Win In Inter Continental Cup Against Mangolia)

महत्वाच्या बातम्या –
पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूचा भारतीय प्रशिक्षक राहुल द्रविडवर दावा; म्हणाले, “…तो कोच म्हणून शुन्य” 
IND vs AUS: भारत 296 धावांवर सर्वबाद, तिसऱ्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियाने गमावल्या चार महत्वाच्या विकेट्स

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---