भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज श्रेयस अय्यर सध्या दुखापतीचा सामना करत आहे. आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार असणारा श्रेयस आयपीएल 2023 मध्येही दुखापतीमुळे खेळू शकत नाहीये. ताज्या माहितीनुसार लवकरच अय्यर या पाठीच्या दुखापतीवर शस्त्रक्रिया करणार आहे. शस्त्रक्रियेनंतर अय्यरला संपूर्ण आयपीएल 2023 हंगाम आणि जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यातून माघार घ्यावी लागू शकते.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात चार सामन्यांची कसोटी मालिका खेळली गेली. भारताने या मालिकेत 2-1 असा विजय मिळवला. पण मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्यात श्रेयसच्या पाठीला दुखापत झाली, जो अहमदाबादमध्ये खेळला गेला होता. दुखापतीच्या कारणास्तव अहमदाबाद कसोटीत श्रेयसला फलंदाजी करता आली नाही आणि तो मैदानातून बाहेर झाला. माध्यमांतील वृत्तांनुसार अय्यरच्या पाठीला झालेली ही दुखापत गंभीर आहे. याच पार्श्वभूमीवर तो यावर लवकरच विदेशात शस्त्रक्रियेसाठी रवाना होणार आहे. माहितीनुसार पुढचे किमान तीन महिने श्रेयस अय्यर क्रिकेटच्या मैदानातून बाहेर असेल.
दुखापतीच्या कारणास्तव आयपीएल 2023 सुरू होण्यापूर्वी तो या हंगामातील अर्धे सामने खेळणार नाही, अशी माहितीही दिली गेली होती. पण मंगळवारी (4 एप्रिल) अखेर त्याने संपूर्ण हंगामातून माघार घेतल्याचे समजले. तसेच जुन महिन्यात जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. 7 ते 11 जून दरम्यान हा सामना लंडच्या द ओव्हल स्टेडियमवर खेळला जाणार आहे. डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ आमने सामने असणार आहेत. पण भारतीय संघाचा महत्वाचा फलंदाज अय्यर मात्र या सामन्यासाठीही उपलब्ध नसेल. पुढच्या किमान तीन महिन्यांसाठी अय्यर मैदानातून बाहेर राहण्याची शक्यता आहे. (Big news! Major surgery on Shreyas Iyer soon, important update on WTC finals too)
बातमी अपडेट होत आहे…
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
गरज पडते तेव्हा ‘हा’ खेळाडू धोनीच्या मदतीला येतो धावून, चेन्नईच्या विजयानंतर डिविलियर्सचे मोठे भाष्य
धोनीने सामनाच नाही, तर मनेही जिंकली; विजयानंतर ‘माही’चा अन् गौतमच्या मुलीचा प्रेमळ फोटो तुफान व्हायरल