इंडियन प्रीमिअर लीगमधून मोठी बातमी समोर येत आहे. स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघापैकी एक असलेल्या मुंबई इंडियन्स संघाने आपल्या गोलंदाजी प्रशिक्षकाबाबत मोठी घोषणा केली आहे. त्यांनी श्रीलंकेचा माजी दिग्गज वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा याला गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले आहे. मलिंगा हा आता मुख्य प्रशिक्षक मार्क बाऊचर आणि माजी संघसहकारी कायरन पोलार्ड यांच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सच्या प्रशिक्षक संघात सामील होईल. अशाप्रकारे रोहित शर्मा, पोलार्ड आणि मलिंगा हे त्रिकुट पुन्हा एकदा एकत्र येणार आहे.
आता आगामी आयपीएल 2024 (IPL 2024) हंगामात लसिथ मलिंगा (Lasith Malinga) मुंबई इंडियन्स संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षकाची जबाबदारी पार पाडताना दिसेल. गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून मुंबई इंडियन्स हा त्याचा तिसरा संघ आहे. विशेष म्हणजे, तो मेजर लीग क्रिकेटमध्ये एमआय न्यूयॉर्क आणि एसए20 लीगमध्ये एमआय केपटाऊन संघाचाही गोलंदाजी प्रशिक्षक आहे. हे दोन्ही मुंबई इंडियन्सचेच फ्रँचायझी संघ आहेत.
मलिंगा संघाचा भाग बनल्याविषयीची पोस्ट शेअर करत मुंबई इंडियन्सने शानदार कॅप्शन दिले आहे. त्यांनी ट्वीट (एक्स) करत लिहिले की, “फलंदाजी प्रशिक्षक- पोलार्ड, गोलंदाजी प्रशिक्षक- मलिंगा. पलटण, आता कसं वाटतंय?”
𝗕𝗔𝗧𝗧𝗜𝗡𝗚 𝗖𝗢𝗔𝗖𝗛 – 🄿🄾🄻🄻🄰🅁🄳
𝗕𝗢𝗪𝗟𝗜𝗡𝗚 𝗖𝗢𝗔𝗖𝗛 – 🄼🄰🄻🄸🄽🄶🄰Paltan, आता कसं वाटतय? 🤩#OneFamily #MumbaiIndians #MumbaiMeriJaan @malinga_ninety9 @KieronPollard55 pic.twitter.com/bdPWVrfuDy
— Mumbai Indians (@mipaltan) October 20, 2023
लसिथ मलिंगा याने मुंबईशी जोडल्यानंतर मोठी प्रतिक्रिया दिली. त्याने म्हटले की, “मुंबई इंडियन्सचा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती होणे ही माझ्यासाठी खरोखरच सन्मानाची गोष्ट आहे. एमआय न्यूयॉर्क आणि एमआय केपटाऊननंतर #OneFamily मधील माझा प्रवास सुरूच आहे. मी मार्क, पॉली, रोहित आणि उर्वरित संघ, विशेषत: गोलंदाजी विभाग, ज्यांचा दृष्टीकोन मला गेल्या हंगामात आवडला, आणि उत्कंठापूर्ण एमआय पलटणच्या पाठिंब्याने उत्कृष्ट कामगिरी करण्याची क्षमता असलेल्या तरुण एमआय प्रतिभेसोबत जवळून काम करण्यासाठी उत्सुक आहे.”
Rohit Sharma, Kieron Pollard and Lasith Malinga trio will reunite for the Mumbai Indians in IPL 2024.
– The captain, batting coach and bowling coach! pic.twitter.com/OLhm5HnYL4
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 20, 2023
लसिथ मलिंगाची आयपीएल कारकीर्द
लसिथ मलिंगा हा तब्बल 13 वर्षे मुंबई इंडियन्सचा भाग होता. तो 2009हंगामापासून मुंबईसोबत होता. 11 वर्षे तो खेळाडू म्हणून मुंबईकडून खेळला. तसेच, 1 वर्षे त्याने (आयपीएल 2018) मुंबईच्या गोलंदाजी मार्गदर्शकाची भूमिका बजावली. तसेच, 2023मध्ये एमआय न्यूयॉर्कचा गोलंदाजी प्रशिक्षक बनला. तो मुंबईने जिंकलेल्या 7 किताबांचा भाग राहिला आहे. त्यात 4 आयपीएल, 2 चॅम्पियन्स लीग टी20 आणि 1 मेजर लीग क्रिकेट लीग (गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून) यांचा समावेश आहे.
त्याच्या आयपीएल कारकीर्दीविषयी बोलायचं झालं, तर त्याने 122 सामने खेळताना 19.80च्या सरासरीने आणि 7.14च्या इकॉनॉमी रेटने 170 विकेट्स घेतल्या आहेत. 13 धावा खर्चून 5 विकेट्स ही त्याची यादरम्यानची सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी आहे. (Big News Mumbai Indians Announce MI Legend Lasith Malinga as Bowling Coach read here)
हेही वाचा-
पंड्याबाबत धक्कादायक ब्रेकिंग! बलाढ्य न्यूझीलंडविरुद्ध खेळणार की नाही? खुद्द बीसीसीआयने दिली माहिती
विराटला करायचे नव्हते शतक, पण राहुलने कशी घातली समजूत? स्वत:च केलाय खुलासा, लगेच वाचा