वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेपूर्वी पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझम याच्याविषयी धक्कादायक बातमी समोर येत आहे. पोलिसांनी बाबर आझमचे चलन कापले आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, पोलिसांनी कार वेग मर्यादेपेक्षा जास्त वेगाने चालवल्यामुळे बाबर आझमचे चलन कापले आहे. तसेच, त्याच्यावर दंडात्मक कारवाईही केली आहे. आता सोशल मीडियावर यादरम्यानचा फोटो जोरदार व्हायरल होत आहे.
बाबरच्या अडचणीत वाढ
बाबर आझम (Babar Azam) याचा एक फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या फोटोत बाबर रस्त्याच्या कडेला पोलिसासोबत दिसत आहे. त्याच्यासोबतच त्याची ऑडी ही कारही बाजूला उभी आहे. पोलीस त्याला काहीतरी समजावून सांगताना दिसत आहेत. माध्यमांतील वृत्तांमध्ये असा दावा केला जात आहे की, वेग मर्यादा ओलांडल्यामुळे त्याला अडवण्यात आले असून दंड ठोठावला आहे. यापूर्वी वर्षाच्या सुरुवातीला बाबरला गाडीच्या नंबर प्लेट नसल्यामुळे अडचणींचा सामना करावा लागला होता.
Babar Azam fined for overspeeding on Pakistan’s Punjab motorway ahead of 2023 ODI World Cup ( Sportseeda) pic.twitter.com/RJ7nJwrXuM
— Broken Cricket (@BrokenCricket) September 26, 2023
Once again Chalan for Babar Azam😭.#BabarAzam𓃵 | #WorldCup2023 pic.twitter.com/ag9kImVhkM
— Ehtisham Siddique (@iMShami_) September 25, 2023
न्यूझीलंडविरुद्ध खेळणार सराव सामना
पाकिस्तान संघ बाबर आझम याच्या नेतृत्वाखाली आशिया चषक 2023 स्पर्धेत शानदार प्रदर्शन करण्यात अपयशी ठरला होता. संघ साखळी फेरीत भारत आणि श्रीलंका संघाविरुद्ध पराभूत झाला होता. त्यानंतर बाबरला कर्णधारपद आणि धावा न करण्यावरून टीकेचा धनी व्हावे लागले होते. अशात आता वनडे विश्वचषक 2023 (ODI World Cup 2023) स्पर्धेपूर्वी पाकिस्तान संघ 27 सप्टेंबर रोजी भारतात पोहोचेल. यानंतर पाकिस्तान संघ 29 सप्टेंबर रोजी हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडिअममध्ये न्यूझीलंडविरुद्ध सराव सामने खेळेल. पाकिस्तान संघ अखेरचा टी20 विश्वचषक 2016मध्ये भारतात आला होता. आता 7 वर्षांनंतर पाकिस्तान क्रिकेट संघ पुन्हा एकदा भारतात येणार आहे.
वनडे विश्वचषकासाठी पाकिस्तान संघ
बाबर आजम (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), फखर जमान, इमाम-उल-हक, अब्दुल्ला शफीक, मोहम्मद रिजवान (यष्टीरक्षक), इफ्तिखार अहमद, सलमान अली आगा, सऊद शकील, मोहम्मद नवाज, शाहीन शाह आफ्रिदी, हॅरिस रऊफ, हसन अली, उसामा मीर आणि वसीम ज्युनियर. (big news pakistan cricket captain babar azam fined over speeding highway pakistan police read here)
महत्त्वाच्या बातम्या-
‘मग त्यांच्याशी भांडावे का?’, भारताविरुद्ध आक्रमकता न दाखवण्याच्या प्रश्नावर PAK गोलंदाजाचे लक्षवेधी उत्तर
‘विराटसाठी ही वेळ खराब नसेल…’, कोहलीने कधी घ्यावी Retirement? एबी डिविलियर्सने स्पष्टच सांगितले