---Advertisement---

अखेर पाकिस्तान संघाला मिळाला भारताचा व्हिसा, ‘या’ दिवशी होणार IND vs PAK सामना; लगेच वाचा

Breaking
---Advertisement---

भारत विरुद्ध पाकिस्तान संघात दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघ चॅम्पियनशिप स्पर्धेचा महासंग्राम 21 जून रोजी होणार आहे. हा सामना बुधवारी (दि. 21 जून) बंगळुरूच्या कांतीरवा स्टेडिअम येथे सायंकाळी 7.30 वाजेपासून खेळला जाणार आहे. यापूर्वीच मोठी बातमी समोर येत आहे. या सामन्याच्या एक दिवस आधीच पाकिस्तान फुटबॉल संघाला भारताचा व्हिसा मिळाला आहे. पाकिस्तान संघ सध्या मॉरिशसमध्ये आहे. अशात त्यांना लवकरात लवकर विमानात बसायचे आहे. असे म्हटले जात आहे की, पाकिस्तान संघ या सामन्याच्या 12 तास आधी बंगळुरूत येऊ शकतो.

रविवारी पोहोचायचे होते भारतात
पाकिस्तान फुटबॉल संघाला आधी रविवारी (दि. 18 जून) भारतात यायचे होते, परंतु मॉरिशस येथे त्यांना व्हिसा जारी न झाल्यामुळे उशीर झाला. ते केनिया आणि जिबूती यांसह चार देशांच्या स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी मॉरिशस येथे गेले होते. पाकिस्तान फुटबॉल संघ व्यवस्थापनाने मॉरिशसच्या दूतावासाद्वारे मागील गुरुवारी भारतीय व्हिसासाठी अर्ज केला होता. त्यामुळे ते आशा करत होते की, ही प्रक्रिया शनिवारपर्यंत पूर्ण होईल.

मात्र, सुट्ट्यांमुळे पाकिस्तान फुटबॉल संघाला व्हिसा जारी करण्यात उशीर झाला. माध्यमांतील वृत्तांनुसार, पाकिस्तान फुटबॉल महासंघाने पुष्टी केली आहे की, सोमवारी (दि. 19 जून) सायंकाळी व्हिसा जारी करण्यात आला आहे. तसेच, आता संघ लवकरात लवकर भारतात पोहोचण्याची आशा करत आहे.

पाकिस्तान संघ मंगळवारी (दि. 20 जून) सायंकाळपर्यंत बंगलुरूत पोहोचला नाही, तर दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघ (South Asian Football Federation) चषकाचा बहुप्रतिक्षित भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) सामना पुढे ढकलण्याच्या पर्यायाचा वापर तेव्हाच केला जाऊ शकतो. सहा महिन्यांहून कमी वेळात कोणत्याही पाकिस्तान संघाचा हा दुसरा भारत दौरा असेल. फेब्रुवारी 2023मध्ये पाकिस्तान स्क्वॉश संघ आशियाई ज्युनिअर चॅम्पियनशिपमध्ये भाग घेण्यासाठी चेन्नईमध्ये आला होता. (big news pakistan football team issued indian visas for saff cup ind vs pak match on 21 june read)

महत्वाच्या बातम्या-
BREAKING: भारताने उंचावला इंटरकॉन्टिंनेंटल फुटबॉल कप, कॅप्टन छेत्री ठरला नायक
स्टार फुटबॉलपटू ‘बाबू कमल’ बनला अभिनेता, वाचा सविस्तर

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---