Friday, March 31, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सौराष्ट्र संघ बनला रणजी ट्रॉफी 2023चा चॅम्पियन, 3 वर्षात दुसऱ्यांदा पटकावला किताब

बिग ब्रेकिंग! सौराष्ट्र संघ बनला रणजी ट्रॉफी 2023चा चॅम्पियन, 3 वर्षात दुसऱ्यांदा पटकावला किताब

February 19, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
Jaydev-Unadkat

Photo Courtesy: Twitter/BCCIdomestic


देशातील सर्वात मोठ्या रणजी ट्रॉफी 2023 स्पर्धेला विजेता मिळाला. रविवारी (दि. 19 फेब्रुवारी) रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात सौराष्ट्र संघाने बंगालला 9 विकेट्सने पराभूत करत किताब पटकावला. विशेष म्हणजे, मागील 3 हंगामात सौराष्ट्र संघ दुसऱ्यांदा विजेता बनला आहे. अंतिम सामन्यात जयदेव उनाडकट याने त्याच्या शानदार कामगिरीच्या जोरावर आपल्या संघाला विजेतेपदाचा मानकरी बनवले.

अंतिम सामन्यात बंगाल संघाने पहिल्या डावात 174 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना सौराष्ट्र संघाने 404 धावांचा डोंगर उभा केला. त्यानंतर दुसऱ्या डावात बंगालचा डाव 241 धावांवरच संपुष्टात आला. अशात सौराष्ट्रने दुसऱ्या डावात एक विकेट गमावत 14 धावा केल्या आणि अंतिम सामन्यात ऐतिहासिक विजय मिळवला. सौराष्ट्र (Saurashtra) संघाचा कर्णधार जयदेव उनाडकट (Jaydev Unadkat) याने अंतिम सामन्यात एकूण 9 विकेट्स घेत संघाला विजयी केले. या कामगिरीसाठी त्याला सामनावीर पुरस्कारानेही गौरवण्यात आले. तसेच, संपूर्ण स्पर्धेत शानदार कामगिरी करणाऱ्या अर्पित वसवदा याला मालिकावीर म्हणून गौरवले.

That Winning Feeling 🏆 😊

Congratulations to the @JUnadkat-led Saurashtra on their #RanjiTrophy title triumph 🙌 🙌 #BENvSAU | #Final | @saucricket | @mastercardindia

Scorecard 👉 https://t.co/hwbkaDeBSj pic.twitter.com/m2PQKqsPOG

— BCCI Domestic (@BCCIdomestic) February 19, 2023

जयदेव उनाडकट याने सौराष्ट्र संघाला त्याच्या नेतृत्वात दुसऱ्यांदा विजेता बनवले आहे. त्याने एक कर्णधार आणि खेळाडू दोन्ही भूमिका लीलया पार पाडत दमदार प्रदर्शन केले. तसेच, आपल्या संघाला तीन वर्षात 2 वेळा विजेतेपदाचा मानकरी बनवले.

सौराष्ट्र संघाचा कर्णधार जयदेव उनाडकट याने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी चेतन सकारिया आणि जयदेव उनाडकट याच्यासोबत मिळून बंगालची धावसंख्या 2 असताना 3 विकेट्स घेतल्या. त्यानंतरही बंगालच्या विकेट्स पडत राहिल्या. बंगालच्या 65 धावसंख्येवर 6 विकेट्स पडल्या होत्या. त्यानंतर शाहबाज अहमद आणि अभिषेक पोरेल यांनी 101 धावांची भागीदारी रचत संघाचा डाव सांभाळला. त्यांनी संघाची धावसंख्या 166 धावांच्या पार नेण्यास मदत केली. शाहबाज 69 आणि अभिषेक 50 धावसंख्येवर बाद झाला. या दोघांव्यतिरिक्त अनुस्तूप मजूमदार (16) आणि आकाश घटक (17) यांनाच दोन आकडी धावसंख्या शिवता आली. बंगालचे तीन खेळाडू एकही धाव करू शकले नाहीत. बंगालने पहिल्या डावात 174 धावा केल्या. यावेळी सौराष्ट्रकडून उनाडकट आणि सकारिया यांनी प्रत्येकी 3 विकेट्स नावावर केल्या. तसेच, चिराज जाणी आणि धर्मेंद्र सिंग जडेजा यांनी प्रत्येकी दोन विकेट्स नावावर केल्या.

सौराष्ट्रच्या 400हून अधिक धावा
बंगालला 174 धावांवर रोखल्यानंतर सौराष्ट्र संघाने शानदार फलंदाजी केली. त्यांच्याकडून हार्विक देसाई, जॅक्सन वसवदा आणि चिराग जानी यांनी अर्धशतके झळकावली. कर्णधार उनाडकट, जय गोहिल आणि चेतन सकारिया हे असे खेळाडू होते, ज्यांना दहा धावांचा आकडाही शिवता आला नाही. संपूर्ण संघाच्या जोरावर सौराष्ट्र संघाने 404 धावांचा डोंगर उभा केला. तसेच, पहिल्या डावात मोठी आघाडी घेतली. बंगालकडून मुकेश कुमार याने 4, तर आकाश दीप आणि ईशान पोरेल यांनी प्रत्येकी 3 विकेट्स नावावर केल्या.

बंगाल दुसऱ्या डावात अपयशी
दुसऱ्या डावात बंगाल संघाने थोडीफार चांगली कामगिरी केली. त्यांनी यावेळी 241 धावा चोपल्या. अनुस्तूप मजूमदार आणि कर्णधार मनोज तिवारी यांनी अर्धशतक झळकावले. मात्र, बंगालला सामन्यात पुनरागमन करण्यासाठी एवढंसं पुरेसं नव्हतं. जयदेव उनाडकटने 6 आणि चेतन सकारिया याने 3 विकेट्स आपल्या नावावर केल्या तसेच बंगालला मोठी धावसंख्या करण्यापासून रोखले. चौथ्या दिवशी सौराष्ट्र संघापुढे खूपच छोटे आव्हान होते. तसेच, सौराष्टने एक विकेट गमावत 14 धावा केल्या आणि दुसऱ्यांदा रणजी ट्रॉफीवर आपले नाव कोरले. (big news saurashtra wins ranji trophy for third time in last three seasons bets bengal by nine wickets in final)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कसोटीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध ‘बाप’ कामगिरी करणारे 3 आशियाई स्पिनर्स, यादीत जडेजा एकमेव भारतीय
‘या’ माजी कर्णधाराच्या IPL कारकीर्दीला लागणार पूर्णविराम, सीएसकेच्या दिग्गजाची मोठी भविष्यवाणी


Next Post
Virat-Kohli-Record

किंग कोहलीचा भीम पराक्रम! 25000 धावांचा टप्पा पार करताच मोडला 'मास्टर ब्लास्टर'चाही World Record

Team-India

टीम इंडियाकडून 6 विकेट्सने ऑस्ट्रेलियाचा सुफडा साफ, 36 वर्षांच्या विक्रमाला धक्काही लागला नाही

Saurashtra-Ranji-Team-2023

बंगालला झुकवत सौराष्ट्रने पटकावली रणजी ट्रॉफी, आजवरचे विजेता-उपविजेता एका क्लिकवर घ्या जाणून

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143