Saturday, January 28, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जयदेव उनाडकटने रचला इतिहास, रणजी ट्रॉफीत सौराष्ट्रच्या कर्णधाराने पहिल्यांदाच केली ‘ही’ कामगिरी

जयदेव उनाडकटने रचला इतिहास, रणजी ट्रॉफीत सौराष्ट्रच्या कर्णधाराने पहिल्यांदाच केली 'ही' कामगिरी

January 3, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
Photo Courtesy: Twitter/Jaydev Unadkat

Photo Courtesy: Twitter/Jaydev Unadkat


जयदेव उनाडकट या भारताचाय अनुभवी गोलंदाजासाठी 2022 चा शेवट चांगला राहिला. उनाडकटने तब्बल 12 वर्षांनंतर भारतीय संघासाठी कसोटी सामना खेळला. सध्या उनाडकड जबरदस्त फॉर्ममध्ये आहे आणि 2023 वर्षाची सुरुवात देखील त्याने जबरदस्त केली. रणजी ट्रॉफीच्या चालू हंगामात खेळताना त्याने सामन्याच्या पहिल्याच षटकात हॅट्रिक घेतली.

रणजी ट्रॉफी 2022-23 मध्ये मंगळवारी (3 जानेवारी) सौराष्ट्र आणि दिल्ली संघ आमने सामने आले. सौराष्ट्र संघाचा कर्णधार जयदेव उनाडकड (Jaydev Unadkat) याने नाणेफेक गमावल्यानंतर सौराष्ट्र संघ प्रथम गोलंदाजीला आला. सामन्याच्या पहिल्याच षटकात उनाडकडने विरोधी संघाच्या तीन विकेट्स घेतल्या आणि हॅट्रिक देखील पूर्ण केली. दिल्लीच्या ध्रुव शौरी, वैभव रावल आणि यश धुल यांनी उनाडकडने सामन्याच्या तीसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर तंबूत पाठवले.

दिल्लीचा कर्णदार यश धूल याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा घेतलेला निर्णय उनाडकडने पूर्णपणे चुकीचा ठरवला. रणजी ट्रॉफीच्या इतिहासात सामन्याच्या पहिल्या षटकात घेतली गेलेली ही पहिलीच हॅट्रिक ठरली आहे.  यापूर्वी 2017-18 हंगामात कर्नाटकचा वेगवान गोलंदाज विनय कुमारने पहिल्या आणि तिसऱ्या षटकात मिळून त्याची हॅट्रिक पूर्ण केली होती.

पहिल्या षटकात हॅट्रिक घेतल्यानंतर देखील उनाडकट एवढ्यावर थांबला नाही. त्याच्या दुसऱ्या षटात देखील सौराष्ट्रला अजून दोन विकेट्स मिळाल्या. दुसऱ्या षटकात उनाडकटने  या दोन विकेट्सनंतर त्याने या सामन्यातील पहिल्या डावात स्वतःच्या पाच विकेट्स पूर्ण केल्या. उनाडकडने रणजी सामन्याच्या एका डावात पाच विकेट्स घेण्याची ही 21 वी वेळ ठरली. सामन्यात स्वतःच्या दुसऱ्या षटकात उनाडकटने ललित यादवला चौथ्या चेंडूवर बाद केले. ललितने या सामन्यात एकही धाव केली नाही. या षटकात दिल्लीची धावसंख्या 5 बाद 6 धावा अशी होती. उनाडकटने दोन षटकांमध्ये 2 धावा खर्च करून तब्बल पाच विकेट्स घेतल्या.

दिल्लीचा ध्रुव शौरी रणजी ट्रॉफीच्या चालू हंगामात चांगल्या फॉर्ममध्ये दिसला, पण उनाडकटने या सामन्यात पहिली विकेट त्याचीच घेतली. शौरीने या हंगामातील सहा डावांमध्ये 144.75 च्या स्ट्राईक रेटने 579 धावा केल्या आहेत. उनाडकडचा सध्याचा फॉर्म पाहता तो जबरदस्त आहे. त्याने मागच्या महिन्यात विजय हजारे ट्रॉफीत 10 सामन्यांमध्ये 19 विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर उनाडकटला मिरपूर कसोटीत बांगलादेशविरुद्ध खेळण्याची संधी मिळाली. या सामन्यात उनाडकटने त्याच्या कसोटी कारकिर्दीतील पहिला विकेट मिळवला. भारताने ही कसोटी मालिका 2-0 अशा अंतराने नावावर केली. (Jaydev Unadkat became the first bowler to take a hat-trick in the first over of a Ranji match)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मार्टिना नवरातिलोवाला दुसऱ्यांदा झाला कॅन्सर, महान टेनिसपटूनवर यावेळी डबल अटॅक
विराटचे अतिक्रिकेट खेळणे चिंताजनक”,‌ श्रीलंकन दिग्गजाने ओळखली भविष्याची चाहूल


Next Post
babar azam mohammad rizwan (1)

बाबर-रिझवानची पाकिस्तान संघातून होणार हकालपट्टी? आफ्रिदीने सुरू केली तयारी

hardik pandya deepak hooda

हाच कॉन्फिडन्स हवा! मालिकेआधीच हार्दिक म्हणतोय, "स्लेजिंगची काय गरज? आम्हाला बघूनच त्यांची..."

Suryakumar-Yadav

'गावसकर-तेंडुलकरांना जवळून पाहिलं, पण सूर्याचा विषयच वेगळा...', माजी प्रशिक्षकांचा दावा

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143