---Advertisement---

Paris Olympics: आज भारताच्या खात्यात येऊ शकते ‘सहावे’ पदक, जाणून घ्या दिवसभराचे वेळापत्रक

On: शुक्रवार, ऑगस्ट 9, 2024 10:25 AM
---Advertisement---

पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये आज (09 ऑगस्ट) भारताचा 14 वा दिवस असणार आहे. आतापर्यंत पूर्ण झालेल्या 13 दिवसांत भारताच्या खात्यात एकूण 5 पदके जमा झाली असून ज्यामध्ये 4 कांस्य आणि 1 रौप्यपदकांचा समावेश आहे. आता 14व्या दिवशी भारताला सहावे पदक मिळू शकते. 13व्या दिवशी, भारताला पॅरिस ऑलिम्पिकचे पहिले रौप्यपदक मिळाले, जे नीरज चोप्राने भालाफेक स्पर्धेत जिंकले होते. याशिवाय 13व्या दिवशी भारतीय हॉकी संघाने कांस्यपदकावर कब्जा केला होता. आतापर्यंत भारताने नेमबाजीत तीन, हॉकीमध्ये एक आणि भालाफेकमध्ये एक पदके जिंकली आहेत. आता आज भारताला कुस्तीत पदक मिळू शकते.

आज भारतीय कुस्तीपटू अमन सेहरावत कांस्यपदकासाठी सामना खेळणार आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला सहावे पदक जिंकून देणारा अमन सेहरावत खेळाडू बनू शकतो. खरे तर, अमनला उपांत्य फेरीच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता, त्यामुळे तो आज कांस्यपदकासाठी मैदानात उतरणार आहे. उपांत्य फेरीत अमनला जपानच्या रे हिगुचीकडून पराभव स्वीकारावा लागला. हिचुगीने उपांत्य फेरीत अमनचा 10-0 असा पराभव केला होता.

आता अमन कांस्यपदकाच्या लढतीसाठी मैदानात उतरणार आहे. त्याची कांस्यपदकाची लढत पोर्तो रिकोच्या डॅरियन क्रूझशी रात्री 10.45 वाजता होईल. याशिवाय, पुरुष आणि महिलांचे 4*400 मीटर रिले संघ मैदानावर असतील. याशिवाय गोल्फची तिसरी फेरी होणार आहे, ज्यामध्ये आदिती अशोक आणि दीक्षा डागर मैदानावर दिसणार आहेत.

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचे आजचे (09 ऑगस्ट) वेळापत्रक

गोल्फ

महिला वैयक्तिक स्ट्रोक प्ले राउंड 3 दुपारी 12:30 वाजता
आदिती अशोक आणि दीक्षा डागर

ॲथलेटिक्स 

महिलांची 4×400 मीटर रिले (पहिली फेरी) दुपारी 2:10 वाजता

पुरुषांची 4×400 मीटर रिले (पहिली फेरी) दुपारी 2:35 वाजता

कुस्ती

पुरुषांची फ्रीस्टाइल 57 किलो (कांस्यपदक सामना) रात्री 10.45 वाजता
अमन सेहरावत विरुद्ध डेरियन तोई क्रूझ

हेही वाचा-

‘प्रत्येक खेळाडूचा दिवस…’, नीरज चोप्रा ‘सिल्व्हर’ जिंकल्याने दुःखी? पाहा पहिली प्रतिक्रिया आली समोर
अफाट साैंदर्य पडलं महागात, जलतरणपटूला सुंदर असल्याकारणानं ऑलिम्पिमधून पडावं लागलं बाहेर
हक्काचं ‘सुवर्ण’ थोडक्यात हुकलं, यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये नीरजची राैप्य पदकाची कमाई

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---