Shakib al Hasan Politics: क्रिकेटविश्वातून मोठी बातमी समोर येत आहे. ही बातमी बांगलादेशचा दिग्गज खेळाडू शाकिब अल हसन याच्याशी संबंधित आहे. क्रिकेटचं मैदान गाजवणारा शाकिब आता राजकारणात उतरणार आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, शाकिब निवडणूक लढवणार आहे. तो 12वी संसदीय निवडणूक लढवण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. तो माजी कर्णधार मश्रफे मुर्तझा याच्या पावलांवर पाऊल टाकण्यासाठी सज्ज झाला आहे. मुर्तझानेही यापूर्वी निवडणुका लढवल्या होत्या. तो आता खासदार आहे.
आयपीएलमधून बाहेर
शाकिब अल हसन (Shakib Al Hasan) याला आयपीएल 2024 (IPL 2024) स्पर्धेतून बाहेर केले आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघाने आयपीएल 2024 रिटेन्शनच्या दिवशी शाकिब आणि लिटन दास यांना रिलीज केले. याव्यतिरिक्त अष्टपैलू शाकिब दुखापतग्रस्त झाल्यामुळे त्याच्या बरे होण्याची वेळ निश्चित नाहीये. त्यामुळे आता त्याने राजकारणात हात आजमावण्याचा निर्णय घेतला आहे.
Shakib Al Hasan will take part in Bangladesh's parliamentary elections. pic.twitter.com/v8C7vTWy6J
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 26, 2023
विश्वचषकात झालेला दुखापतग्रस्त
शाकिब वनडे विश्वचषकात दुखापतग्रस्त झाला होता. त्याच्या बोटाला दुखापत झाली होती. आता तो राजकारणात पाऊल ठेवत आहे. शाकिबविषयी आधीपासूनच असे तर्क लावले जात होते की, तो विश्वचषकानंतर कर्णधारपदावरून पायउतार होऊ शकतो. मात्र, त्याच्या राजकारणातील प्रवेशाची कोणतीही अपेक्षा केली नव्हती. शाकिब त्याच्या स्थानिक मतदारसंघातून म्हणजेच मागुरा-1 मतदारसंघातून निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे.
Shakib Al Hasan nominated from #Magura1 for 12th National Election. #MPshakib pic.twitter.com/imBjU0GPJC
— Dew (@shishirkawser) November 26, 2023
शाकिब नसेल संघाचा कर्णधार
शाकिब आता वनडे संघाचा कर्णधार नसेल. याचा निर्णय त्याने विश्वचषकापूर्वीच घेतला होता. मात्र, तो टी20 क्रिकेट संघाचे नेतृत्व करत राहील. टी20 विश्वचषक 2024 जवळ आल्याने त्याचे जास्त लक्ष टी20 क्रिकेटवर असेल. विशेष म्हणजे, आयपीएलमधून बाहेर पडला असला, तरीही शाकिब पाकिस्तान क्रिकेट लीगमध्ये खेळणार आहे. शाकिब एकमेव बांगलादेशी खेळाडू आहे, ज्याला प्लॅटिनम श्रेणीत ठेवले गेले आहे, जो पीएसएलमधील आतापर्यंतची सर्वोच्च श्रेणी आहे. प्लॅटिनम श्रेणीची किंमत 1.30 लाख अमेरिकन डॉलर्स सांगितली जात आहे. विशेष म्हणजे, शाकिब बांगलादेश प्रीमिअर लीगमध्येही खेळताना दिसेल. (big news shakib al hasan election he will fight from his home town know here)
हेही वाचा-
IPL 2024: गुजरात टायटन्सचा कर्णधार बनताच शुबमन गिलची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, ‘इतक्या चांगल्या…’
IPL ब्रेकिंग! पंड्या मुंबईकडे जाताच Gujarat Titansचे कर्णधारपद ‘या’ पठ्ठ्याकडे, उंचावतील तुमच्याही भुवया