---Advertisement---

कॉमनवेल्थ गेम्स 2026च्या ‘या’ खेळामध्ये भारत करणार टॉप! कुस्तीला मात्र वगळले

---Advertisement---

कॉमनवेल्थ गेम्स 2026मध्ये खेळल्या जाणाऱ्या क्रिडा प्रकारांची घोषणा करण्यात आली आहे. कॉमनवेल्थ गेम्स फेडरेशनने बुधवारी (5 ऑक्टोबर) या क्रिडाप्रकारांची यादी जाहीर केली आहे. ही स्पर्धा विक्टोरिया, ऑस्ट्रेलिया येथे खेळली जाणार आहे. यामध्ये शूटिंगचे पुनरागमन झाले असून कुस्तीला वगळले आहे, तर आर्चरी आधीच या स्पर्धेचा भाग नाही. याबरोबरच नऊ पॅरा क्रिडाप्रकारांची नावेही पक्की केली असून त्यांची नियमावलीही जाहीर केली आहे.

जुलै-ऑगस्टमध्ये बर्मिंघम, इंग्लंड येथे खेळण्यात आलेल्या कॉमनवेल्थ गेम्स 2022च्या हंगामात नेमबाजी आणि आर्चरी यांचा सहभाग नव्हता. त्या स्पर्धेत भारताने 22 सुवर्ण, 16 रौप्य आणि 23 कांस्य पदकांसहीत एकूण 61 पदके जिंकली.

या स्पर्धेच्या इतिहासावर एक नजर टाकली तर भारताने सर्वाधिक पदके शूटिंगमध्ये जिंकली आहेत. या स्पर्धेत भारताने आतापर्यंत 564 पदके जिंकली आहेत. यामध्ये 203 सुवर्ण, 190 रौप्य आणि 171 कांस्य पदकांचा सामवेश आहे. यातील 135 पदके नेमबाजी आणि 114 पदके कुस्तीमध्ये जिंकली आहेत. भारताच्या कुस्तीपटूंनी 49 सुवर्णपदके जिंकली आहेत, तर शूटिंगमध्ये 63 सुवर्ण, 44 रौप्य आणि 28 कांस्य पदकांचा समावेश आहे.

2026च्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये गोल्फ, बीएमएक्स रेसिंग आणि कोस्टल रेसिंग यांचे पदार्पण होणार आहे. तसेच हे क्रिडाप्रकार 2028च्या लॉस एंजेल्स ऑलिम्पिकमध्येही खेळले जातील. याशिवाय 3X3 बास्केटबॉल, 3X3 व्हीलचेयर बास्केटबॉल, नेमबाजी, शूटिंग, शूटिंग पॅरा स्पोर्ट्स, माउंटेन बाइक क्रॉसकंट्री, ट्रॅक साइक्लिंग आणि पॅरा साइक्लिंग यांंचा समावेश आहे.

गोल्फ, कोस्टल रोइंग आणि रोड सायक्लिंग रेस यांचा पॅरा स्पोर्ट्समध्ये समावेश करत त्यांची नियमावली जाहीर करण्याची चर्चा कॉमनवेल्थ गेम्स फेडरेशनसोबत सुरू आहे, असे जाहीर केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

कॉमनवेल्थ गेम्स 2026, व्हिक्टोरिया- ऍथलेटिक्स आणि पॅरा ऍथलेटिक्स, बॅडमिंटन (3X3) आणि (3X3) व्हीलचेयर, बॉक्सिंग, बीच वॉलीबॉल, कोस्टल रोइंग, टी-20 क्रिकेट (महिला), साइक्लिंग (बीएमएस, माउंटेन बाइक, रोड, ट्रॅक एंड पॅरा), डायविंग, गोल्फ, जिम्नॅस्टिक, हॉकी, लॉन बाउल्स, पॅरा लॉन बाउल्स, नेटबॉल, पॅरा पॉवरलिफ्टिंग, रग्बी सेविंस, शूटिंग, पॅरा शूटिंग, स्क्वॉश, टेबल टेनिस, पॅरा टेबल टेनिस, ट्रायलथलॉन आणि पॅरा ट्रायलथॉन आणि वेट लिफ्टिंग.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ऐन विश्वचषकापूर्वी सूर्याचा चौथा क्रमांक धोक्यात! स्वतःच व्यक्त केली भीती
VIDEO। रोहित शर्माचे सूर्यकुमारबाबत चकीत करणारे विधान; म्हणाला, ‘मला त्याच्या फॉर्मची चिंता’

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---