आयपीएल गव्हर्निंग काउन्सिलने 17 व्या मोसमाचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. तर यंदाचं वर्ष हे निवडणुकीचं आहे. त्यामुळे यंदा आयपीएल स्पर्धा ही टप्प्यात पार पडणार आहे. त्यानुसार बीसीसीआयने आयपीएलच्या 17 व्या मोसमासाठी पहिल्या टप्प्यातील वेळापत्रक जाहीर केलं आहे. बीसीसीआयने 17 दिवसांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. त्यानुसार 22 मार्च ते 7 एप्रिल दरम्यान पहिला टप्पा पार पडणार आहे. तर पहिल्या टप्प्यात एकूण 17 दिवसांमध्ये 21 सामने पार पडणार आहेत.
याआधी भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतच्या पुनरागमनाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र, आता चाहत्यांची ही प्रतीक्षा संपणार आहे. कारण आता सौरव गांगुलीने ऋषभ पंतच्या पुनरागमनाबाबत मोठा दावा केला आहे. तसेच सध्या ऋषभ पंत राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये (NCA) जोरदार सराव देखील करत आहेत. याबाबत दिल्ली कॅपिटल्स संघाचे क्रिकेट संचालक सौरव गांगुली यांनी ऋषभ पंतच्या पुनरागमनाबद्दल टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले आहे.
पंतने स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी जे काही करायला हवे होते ते केले आहे. त्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) लवकरच पंतला फिट घोषित करू शकते. आम्हाला आशा आहे की एनसीए 5 मार्चला पंतला क्रिकेट खेळण्यासाठी मंजुरी देईल. त्यानंतर आपण कर्णधारपदाबद्दल बोलू. तसेच आम्हाला पंतबद्दल बेफिकीर राहायचे नाही, आम्ही त्याच्याबाबत खूप सावध आहोत. कारण अजून त्याच्याकडे अजून खूप करिअर शिल्लक आहे.
माहितीनुसार ऋषभ पंत आयपीएल 2024 च्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये विकेटकीपिंग करणार नाही. तर तो यावेळी फलंदाज म्हणून खेळणार आहे. तसेच NCA कडून मंजुरी मिळाल्यानंतर, पंत 5 मार्चलाच दिल्ली कॅपिटल्सच्या शिबिरात सामील होऊ शकतो. त्यानंतर पंत पुन्हा एकदा आयपीएल 2024 मध्ये कर्णधार म्हणून दिसणार आहे.
Rishabh Pant is set to get clearance from NCA on March 5th ahead of IPL. [TOI]
– Great news for Indian cricket. 🇮🇳 pic.twitter.com/a8WgYDqkNr
— Johns. (@CricCrazyJohns) March 2, 2024
दरम्यान, ऋषभ पंतचा 2022 च्या अखेरीस कार अपघात झाला होता. या अपघातात पंत गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर पंत एक वर्षाहून अधिक काळ क्रिकेटपासून दूर राहिला. या काळात पंतने आयपीएल 2023, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल, आशिया कप 2023 आणि एकदिवसीय वर्ल्ड कप 2023 सारख्या मोठ्या स्पर्धांनामधुन बाहेर बसावे लागले होते. पण पंत आता पुन्हा एकदा मैदानावर चौकार आणि षटकार मारण्यासाठी सज्ज झाला आहे.
महत्वाच्या बातम्या –
- राजकारणातून तडफातडफी निवृत्ती घेतलेल्या गौतम गंभीरशी संबंधित अशा 5 गोष्टी, ज्या फार कमी लोकांना माहित आहेत
- इशान किशनला बीसीसीआयच्या वार्षिक करारातून वगळल्यानंतर मिळाला ‘या’ प्रशिक्षकाचा पाठिंबा; म्हणाला….