भारताचा स्टार फलंदाज इशान किशनला बीसीसीआयने त्याच्या केंद्रीय करारातून वगळले आहे. त्यावरून तो चांगलाच चर्चेत आला आहे. तर सोशल मीडियावर ईशानचे चाहतेही इशानला कॉन्ट्रॅक्टमधून बाहेर काढल्याने संतापले होते. आता इशान किशनला चेन्नईच्या गोलंदाजी प्रशिक्षकाची साथ मिळाली आहे. तसेच ईशान किशन काल अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंगमध्ये दिसला होता.
यावेळी तेथे अनेक क्रिकेटर पहायला मिळाले होते. तेव्हा वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटर आणि चेन्नई सुपर किंग्जचा गोलंदाजी प्रशिक्षक ड्वेन ब्राव्हो देखील अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंगला हजर होता. यावेळी आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणारा इशान किशनही तिथे उपस्थित होता. त्यानंतर ड्वेन ब्राव्होने इशान किशन आणि वेस्ट इंडिजचा स्फोटक यष्टीरक्षक फलंदाज निकोलस पूरन यांची भेट घेतली. यानंतर ब्राव्होने या दोन खेळाडूंसोबत काढलेले फोटो पाहायला मिळाले आहेत.
याबरोबरच इशान किशनला भारतीय संघातून बाहेर पडल्यानंतर देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचा सल्ला दिला होता. पण ईशान किशन तो सल्ला दुर्लक्ष केला होता. त्यानंतर बीसीसीआयने ईशान किशनला बीसीसीआय सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधून मुक्त केले आहे. तसेच ईशान किशनबाबत बीसीसीआयचा हा निर्णय देशांतर्गत क्रिकेटमध्ये सहभागी होण्याच्या मुद्यावरून होता.
https://www.instagram.com/p/C39yr3FIFir/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==
दरम्यान, याआधी ईशान किशनचा दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी कसोटी संघात समावेश करण्यात आला होता. त्यानंतर ईशान किशनने या मालिकेतून विश्रांती मागितली होती. तेव्हापासून इशान सतत क्रिकेटपासून दूर आहे. इशान इंग्लंडसोबत खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेत पुनरागमन करेल अशी चाहत्यांना आशा होती. पण तसे झाले नाही. त्यानंतर तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी निवडकर्त्यांनी इशान किशनशी बोलणे केले होते, परंतु इशानने तंदुरुस्त नसल्याचे कारण देत आपले नाव मागे घेतले होते.
महत्वाच्या बातम्या –
- वयाच्या 48 व्या वर्षी शोएब अख्तर तिसऱ्यांदा झाला बाप, मुलगी की मुलगा? वाचा सविस्तर
- गौतम गंभीर तडफातडफी घेतली राजकारणातून निवृत्ती, आता दिसणार फक्त क्रिकेटच्या मैदानावर; घ्या जाणून काय आहे प्रकरण