इंडियन प्रीमिअर लीग 2023चा महासंग्राम दिमाखात पार पडत आहे. या स्पर्धेचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. अशातच, धक्कादायक बातमी समोर येत आहे. सनरायझर्स हैदराबाद संघाचा हुकमी एक्का मानला जात असलेला अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर आयपीएल 2023 स्पर्धेतून बाहेर पडला आहे. सुंदर याला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाल्यामुळे पुढील सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही. याची माहिती स्वत: हैदराबाद संघाने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून दिली आहे.
सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) संघाने अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेतून बाहेर पडल्याची माहिती दिली. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिले की, “हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे वॉशिंग्टन सुंदर आयपीएल 2023मधून बाहेर पडला आहे. लवकर बरा हो वॉशी.”
🚨 INJURY UPDATE 🚨
Washington Sundar has been ruled out of the IPL 2023 due to a hamstring injury.
Speedy recovery, Washi 🧡 pic.twitter.com/P82b0d2uY3
— SunRisers Hyderabad (@SunRisers) April 27, 2023
वॉशिंग्टन सुंदर हा स्पर्धेतून बाहेर पडल्यामुळे हा हैदराबादसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
दिल्लीविरुद्ध शानदार कामगिरी
वॉशिंग्टन सुंदर याने त्याचा आयपीएल 2023मधील शेवटचा सामना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 24 एप्रिल रोजी होम ग्राऊंड म्हणजेच राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडिअम, हैदराबाद येथे खेळला होता. या सामन्यात दिल्लीने 7 धावांनी विजय मिळवला. असे असले, तरीही संघासाठी वॉशिंग्टनने शानदार कामगिरी केली होती.
सुंदरने या सामन्यात दिल्लीविरुद्ध 4 षटके गोलंदाजी करताना 28 धावा खर्च करत सर्वाधिक 3 विकेट्स घेण्याचा कामगिरी केली होती. त्याने दिल्लीचा कर्णधार डेविड वॉर्नर, सरफराज खान आणि अमन खान यांना बाद केले होते.
स्पर्धेतील कामगिरी
सुंदरनेच्या आयपीएल 2023 स्पर्धेतील कामगिरीविषयी बोलायचं झालं, तर त्याने 7 सामने खेळताना 8.26च्या इकॉनॉमी रेटने 3 विकेट्स घेतल्या आहेत. दुसरीकडे फलंदाजीबाबत बोलायचं झालं, तर त्याने 7 सामन्यात फलंदाजी करताना 15च्या सरासरीने 60 धावा केल्या आहेत. (big news SRH all-rounder Washington Sundar has been ruled out of the IPL 2023 due to a hamstring injury)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ICC T20 Rankings: ‘टॉपर’ सूर्यकुमारच्या जागेला धोका, ‘या’ पाकिस्तानी खेळाडूची दुसऱ्या स्थानी झेप
मोठी बातमी! WTC फायनलमध्ये कोरोनाची चिंता मिटली, पॉझिटिव्ह असूनही खेळू शकणार खेळाडू?