भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. तर आतापर्यंत झालेल्या दोन सामन्यात दोन्हीं संघ 1-1 ने बरोबरीत आहेत. आता उर्वरित तीन सामन्यांसाठी संघ निवडताना निवड समितीची चांगलीच दमछाक झाली आहे होती. पण आता मालिकेतील तिसरा सामना हा 15 ते 19 फेब्रुवारी दरम्यान राजकोटमधील सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे.
यासाठी बीसीसीआयने इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या तीन कसोटींसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. तर नव्या चेहऱ्यालाही संघात संधी मिळाली आहे. तर केएल राहुल आणि रवींद्र जडेजा संघात परतले आहेत. याशिवाय विराट कोहलीने आपले नाव मागे घेतले आहे.
याबरोबरच, जडेजा मालिकेतील पहिल्या सामन्याच्या दुसऱ्या डावात जखमी झाला होता. त्यानंतर जडेजाला दुसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर व्हावे लागले होते. तसेच, क्वाड्रिसेप्सच्या ताणामुळे विशाखापट्टणम कसोटीतून बाहेर पडल्यानंतर केएल राहुल भारतीय संघात परतला आहे. तर हा सामना अष्टपैलू रवींद्र जडेजाच्या घरच्या मैदानावर खेळणार आहे.
तसेच, भारत आणि इंग्लंड यांच्यात अजून तीन कसोटी सामने शिल्लक असून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने प्रत्येक सामना महत्त्वाचा आहे. तर अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी टॉप 2 मध्ये राहणं देखील गरजेचं आहे. सद्यस्थितीत भारतीय संघ तिसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे पहिल्या दोन संघात येण्यासाठी उर्वरित तिन्ही सामने जिंकावे लागणार आहेत.
दरम्यान, बीसीसीआयने शेवटच्या तीन कसोटींसाठी 17 सदस्यीय टीम इंडियाची घोषणा केली आहे. तर वेगवान गोलंदाजीमध्ये उपकर्णधार जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि मुकेश कुमार यांच्यासह युवा आकाश दीपचाही संघात समावेश करण्यात आला आहे.
पुढीलप्रमाणे इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या तीन कसोटींसाठी भारतीय संघ :-
रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, केएल राहुल, रजत पाटीदार, सर्फराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक) , रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार आणि आकाश दीप.
महत्वाच्या बातम्या –