एकीकडे भारतीय क्रिकेट संघाने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत पराभव पत्करून चाहत्यांना निराश केले. दुसरीकडे मात्र भारतीय ज्युनिअर महिला हॉकी संघाने कोट्यवधी भारतीयांची मान अभिमानाने उंचावली. भारताच्या ज्युनिअर महिला हॉकी संघाने इतिहास रचला आहे. रविवारी (दि. 11 जून) त्यांनी पहिल्यांदाच महिला ज्युनिअर हॉकी आशिया चषकाचा किताब जिंकला. अंतिम सामन्यात भारत विरुद्ध दक्षिण कोरिया आमने-सामने होते. हा सामना भारताने 2-1ने नावावर केला.
या महत्त्वाच्या सामन्यात भारतासाठी अनु आणि नीलम यांनी गोल केले. दुसरीकडे, दक्षिण कोरियासाठी एकमेव गोल सियो यिओन हिने केला. या सामन्याच्या पहिल्या क्वार्टरमध्ये एकही गोल होऊ शकला नव्हता. मात्र, त्यानंतर भारताने 22व्या मिनिटाला आघाडी घेतली. भारतासाठी अनुने पेनल्टी कॉर्नरवर गोल केला. तिने गोलकीपरच्या डाव्या बाजूने गोल करत भारताला सामन्यात 1-0 आघाडी मिळवून दिली. दक्षिण कोरियाने तीन मिनिटांनंतर सियो यिओनच्या गोलमुळे सामन्यात 1-1 अशी बरोबरी साधली.
नीलमने 41व्या मिनिटाला दक्षिण कोरियाच्या गोलकीपरच्या डाव्या बाजूने गोल करत भारताला 2-1ने पुन्हा आघाडी मिळवून दिली. हा निर्णायक गोल ठरला. यानंतर भारताने अंतिम क्वार्टरमध्ये आघाडी कायम राखत विजय मिळवला. दक्षिण कोरियाला पेनल्टी कॉर्नरच्या रूपात गोल करण्याच्या अनेक संधी मिळाल्या, परंतु संघाला त्याचा फायदा उचलता आला नाही. यापूर्वी महिला ज्युनिअर आशिया चषकात भारताचे सर्वोत्तम प्रदर्शन 2012मध्ये आले होते, जेव्हा भारताने बँकॉकमध्ये पहिल्यांदा अंतिम सामन्यात धडक दिली होती. मात्र, त्या सामन्यात भारताला चीनकडून 2-5ने पराभूत व्हावे लागले होते.
हॉकी इंडियाची मोठी घोषणा
हॉकी इंडियाने किताब जिंकणाऱ्या संघातील प्रत्येक खेळाडूला रोख 2 लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. यासोबतच त्यांनी सपोर्ट स्टाफच्या प्रत्येक सदस्याला 1 लाख रुपये देण्याचीही घोषणा केली. भारतीय संघ अजिंक्य राहिला आणि या वर्षी चिली येथे होणाऱ्या ज्युनिअर विश्वचषक 2023मध्येही स्थान मिळवले. (big news womens junior asia cup 2023 hockey team india win in final defeated south korea by 2-1)
महत्वाच्या बातम्या-
Indian Junior Women’s Hockey 2023: आत्मविश्वासाने भरलेला भारत चिनी तैपेईशी लढण्यासाठी सज्ज, आकडेवारी पहा
शाब्बास पठ्ठ्यांनो! पाकिस्तानला नमवत भारतीय मुलांनी जिंकला ज्युनियर हॉकी आशिया कप, चौथ्यांदा ठरले मानकरी