---Advertisement---

विश्वचषकापूर्वी OYO कंपनीने उचलले मोठे पाऊल, 10 शहरांमध्ये वाढवणार तब्बल ‘एवढे’ हॉटेल्स

ICC-ODI-World-Cup-2023
---Advertisement---

वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. स्पर्धेचा पहिला सामना अहमदाबाद येथे खेळला जाणार आहे. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड संघ आमने-सामने असणार आहेत. या स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआय बोर्डाने तयारी सुरू केली आहे. अशातच ओयो कंपनीने मोठे पाऊल उचलले आहे. ओयोने विश्वचषक स्पर्धेकडे पाहता 500 हॉटेल्स वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. वृत्तांनुसार, हॉटेल्सच्या किंमतींमध्ये वाढ झाली असून यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अहमदाबाद येथे 15 ऑक्टोबर रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) संघ आमने-सामने येणार आहेत. याच मैदानावर स्पर्धेचा अंतिम सामनाही खेळला जाणार आहे. त्यामुळे अहमदाबाद येथे तीन महिन्यांपूर्वीच हॉटेल्सच्या किंमतींमध्ये वाढ झाली आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, आता ओयो कंपनीनेही विश्वचषक 2023 स्पर्धेबाबत मोठे पाऊल उचलले आहे. स्पर्धेसाठी ओयो 500 हॉटेल्स (OYO 500 Hotels) वाढवणार आहेत. विशेष म्हणजे, हे हॉटेल्स सामन्यांचे आयोजन ज्या शहरांमध्ये होणार आहे, त्याच शहरांमध्ये वाढवले जाणार आहेत.

वृत्तांनुसार ओयोने सांगितले की, “सामन्यांचे आयोजन होत असलेल्या शहरांमध्ये आम्ही 500 हॉटेल्स वाढवणार आहोत. क्रिकेट विश्वचषक पाहता पुढील तीन महिन्यांमध्ये हे काम पूर्ण होईल. आम्ही प्रयत्न करू की, जे इतर शहरात सामने पाहायला जातील, त्यांना आरामदायी जागा मिळू शकतील.”

विशेष म्हणजे, अहमदाबाद येथील हॉटेल्सच्या किंमतीत दुपटीने वाढ झाली आहे. हॉटेल्समध्ये एका रात्री थांबण्यासाठी एक लाख रुपये द्यावे लागू शकतात. 3 ते 4 हजारांपर्यंतच्या हॉटेल्ससाठी 30 ते 40 हजार रुपयेही द्यावे लागू शकतात. याबाबत वेगवेगळ्या बातम्या समोर येत आहेत.

यावेळी विश्वचषकासाठी भारतातील 10 शहरांची निवड करण्यात आली आहे. त्यात अहमदाबाद, हैदराबाद, धरमशाला, दिल्ली, चेन्नई, मुंबई, लखनऊ, पुणे, बंगळुरू आणि कोलकाता या शहरांच्या नावांचा समावेश आहे. या शहरांमध्ये हॉटेल्स वाढवले जातील. (big news world cup 2023 oyo will add 500 hotels for world cup venue cities)

महत्वाच्या बातम्या-
वाढदिवशीच ‘दादा’ची मोठी भविष्यवाणी! सांगूनच टाकलं, विश्वचषकात कुणा-कुणाला मिळेल सेमीफायनलचे तिकीट
लीड्समधील न्हाव्याचा कांगारू खेळाडूवर मोठा आरोप! म्हणाला, ‘त्याने पैसे देण्याचे वचन दिले पण…’

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---