श्रीलंका क्रिकेट बोर्डासाठी आज एक आनंदाची बातमी आली आहे. खरंतर, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने आज श्रीलंका क्रिकेट बोर्डावर घातलेली बंदी तात्काळ प्रभावाने उठवली आहे. सरकारने श्रीलंकन क्रिकेट बोर्डात हस्तक्षेप केल्यानंतर आयसीसीने गेल्या वर्षी एकदिवसीय विश्वचषकादरम्यान त्यांच्यावर बंदी घातली होती. आयसीसीने रविवारी (28 जानेवारी) बंदी उठवल्याची माहिती दिली आहे.
आयसीसीने अधिकृत निवेदन जारी करून ही माहिती दिली आहे. आयसीसीने म्हटले आहे की, “श्रीलंका क्रिकेट बोर्डाने आयसीसीचा सदस्य म्हणून आपल्या कर्तव्यांचे गंभीर उल्लंघन केले आहे. विशेषत: स्वायत्तपणे काम करणे आणि एखाद्याच्या जबाबदाऱ्या पार पाडणे. याच कारणामुळे गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये आयसीसीने बोर्डावर बंदी घातली होती. मात्र, आता ते आपली जबाबदारी पार पाडत असल्याचे आम्हाला वाटते, त्यामुळे ही बंदी तात्काळ उठवण्यात आली आहे.”
2023 च्या विश्वचषक स्पर्धेत भारताविरुद्ध झालेल्या दारुण पराभवानंतर श्रीलंकेच्या संघावर ही बंदी घातली गेली होती. खरं तर, विश्वचषकात श्रीलंकेचा संघ भारताविरुद्ध अवघ्या 55 धावांत ऑलआऊट झाला आणि भारताने हा सामना 302 धावांनी जिंकला होता. या मोठ्या पराभवानंतर श्रीलंकेच्या क्रीडामंत्र्यांनी श्रीलंका क्रिकेट बोर्ड बरखास्त करून त्याजागी माजी कर्णधार अर्जुन रणतुंगा यांच्या अध्यक्षतेखाली अंतरिम समिती नेमण्याचा प्रयत्न केला. मात्र, श्रीलंकेच्या न्यायालयाने त्यावर बंदी घातली होती. क्रिकेट बोर्डावर सरकारचा हा ढवळाढवळ पाहता आयसीसीने श्रीलंका बोर्डावर बंदी घातली होती.
श्रीलंका क्रिकेट बोर्डावर बंदी घालण्यात आल्यानंतर अनेक माजी श्रीलंकेच्या दिग्गजांनी निराशा व्यक्त केली होती. या बंदीमुळे श्रीलंकेकडून अंडर-19 विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद हिरावून घेण्यात आले. सध्या अंडर-19 विश्वचषक श्रीलंकेऐवजी दक्षिण आफ्रिकेत आयोजित केला जात आहे.
महत्वाच्या बातम्या –
IND vs ENG । दुसऱ्या कसोटीतही इंग्लंडचे पारडे झाले जड, महत्वाचा भारतीय खेळाडू बाहेर पडण्याची शक्यता
IND vs ENG । भारताच्या ‘या’ दोन खेळाडूंसाठी वाजली धोक्याची घंटा! पुढच्या कसोटीतून होऊ शकतो पत्ता कट