भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पार पडला. उभय संघांतील या सामन्यात इंग्लनडे 28 धावांनी बाजी मारली आणि मालिकेत 0-1 अशी आघाडी घेतली. पहिल्या डावात भारताला 190 धावांची आघाडी मिळाली होती. पण दुसऱ्या डावात भारतीय संघाचे फलंदाज कमी पडले, असे दिसले. याच पार्श्वभूमीवर मालिकेतील दुसऱ्या सामन्यात खेळण्यासाठी संघातील काही फलंदाजांवर टांकती तलवार आहे.
हैदराबाद कसोटीच्या शेवटच्या डावात भारताला विजयासाठी 231 धावांचे लक्ष्य मिळाले होते. उभय संघांतील या सामन्यात भारतीय फलंदाजांनी पहिल्या डावात 436 धावा कुटल्या होत्या. सलामीवीर यशस्वी जयस्वाल (80), केएल राहुल (86) आणि रविंद्र जडेजा (87) यांनी अर्धशतके ठोकली होती. पण सामन्यातली दुसऱ्या डावात भारताचा एकही फलंदाज अर्धशतकी खेळी करू शकला नाही. परिणामी संघाला 231 धावांचे साधे वाटणारे लक्ष्य देखील गाठता आले नाही. इंग्लंडसाठी या सामन्यातून कसोटी पदार्पण करणाऱ्या टॉम हार्टली () याने पहिल्या डावात 2 विकेट्स घेतल्या होत्या, तर दुसऱ्या डावात त्याने तब्बल 7 विकेट्स नावावर केल्या. या सात विकेट्स घेताना त्याने 26.2 षटके गोलंदाजी केली आणि 62 धावा खर्च केल्या.
हैदराबाद कसोटीच्या दुसऱ्या डावात जवळपास सर्वच भारतीय खेळाडू बॅटने अपेक्षित योगदान देऊ शकले नाहीत. पण या एका सामन्यातील प्रदर्शनामुळे कोणा फलंदाजाचे संघाती स्थान धोक्यात येणे बरोबर नाही. मागच्या जवळपास 10 डावांमध्ये शुबमन गिल (Shubman Gill) आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) या फलंदाजांनी संघासाटी सुमार प्रदर्शन केले आहे. रविवारी (28 जानेवारी) शुबमन गिल 0, तर अय्यर 13 धावा करून बाद झाले. त्याआधी सामन्याच्या पहिल्या डावात गिलने 23, तर अय्यरने 35 धावा केल्या होत्या. मागच्या 10 कसोटी डावांमध्ये गिलची सरासरी धावसंख्या 17.77 असून त्याने 160 धावा केल्या आहेत. अय्यरची सरासरी अजूनच घसरत 14.55 वर येते. त्याने मागच्या 10 डावांमध्ये अवघ्या 131 धावा केल्या आहेत.
A special spell from Tom Hartley leads England to an extraordinary win in the opening Test against India ????#WTC25 | ???? #INDvENG: https://t.co/E53vcqjfHE pic.twitter.com/qoJl3biFfu
— ICC (@ICC) January 28, 2024
या दोघांनी आपल्या शेवटच्या 10 कसोटी डावांमध्ये एकही अर्धशतक केले नाहीये. संघासाठी या दोघांचा फॉर्म चिंतेची बाब बनला आहे. याच कारणास्तव गिल आणि अय्यर दुसऱ्या सामन्यात खेळतील की नाही, हे सध्यातरी खात्रीपूर्वक सांगता येणार नाही. भारत आणि इंग्लंड यांच्यातील ही कसोटी मालिका पाच सामन्यांची आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताचा पराभव केल्यानंतर इंग्लंडला दुसरा सामना 2 फेब्रुवारीपासून विशाखापट्टणममध्ये खेळायचा आहे. (It is expected that these Indian bowlers will not play in next Test match against England)
महत्वाच्या बातम्या –
IND vs ENG । पदार्पण असावे तर असे! टॉम हार्टिलीच्या फिरकीत अडकल्याने हैदराबाद कसोटीत भारत पराभूत
*कसोटी क्रिकेटचे सौंदर्य! वेस्ट इंडीजच्या विजयाने लारांच्या डोळ्यात पाणी, गिलक्रिस्टने मारली मिठी । VIDEO*






