भारतीय संघाचा आघाडीचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग याच्या नुकत्याच झालेल्या खराब कामगिरीवर माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा याने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला की, आयपीएल 2023 पासून अर्शदीपची कामगिरी तशी नाही ज्यासाठी तो ओळखला जातो. आकाश चोप्राच्या म्हणण्यानुसार, अर्शदीप प्रत्येक सामन्यात चांगलाच महागडा ठरत आहे.
त्याच्या यूट्यूब चॅनलवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये आकाश चोप्रा (Akash Chopra) याने अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) याच्यावर प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला, “मला या सामन्यातील अर्शदीप सिंगच्या कामगिरीबद्दल बोलायचे आहे. तो खूप महाग ठरतोय असे वाटत नाही का? जर तुम्ही मागील मालिकेवर देखील नजर टाकली तर तो चार सामने खेळला आणि प्रत्येक सामन्यात त्याने चार षटकांच्या स्पेलमध्ये 40 पेक्षा जास्त धावा दिल्या. त्याने केवळ चार विकेट्स घेतल्या. मी समजू शकतो की, तुम्ही कठीण षटके टाकत आहात पण इतर गोलंदाजही गोलंदाजी करत आहेत. आणि एखादी व्यक्ती नेहमीच इतकी महाग असल्याचे सिद्ध होत नाही. मी अर्शदीप सिंगचा खूप मोठा चाहता आहे आणि त्याची गोलंदाजी सुधारावी अशी माझी इच्छा आहे, पण आयपीएलपासून त्याची कामगिरी खालावली आहे.”
अर्शदीप सिंग याच्याबद्दल बोलायचे झाले तर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात त्याची कामगिरी फारशी चांगली नव्हती. त्याने 2 षटके टाकली ज्यात त्याने 31 धावा दिल्या आणि या कारणास्तव त्याला तिसरे षटक टाकण्यासही दिले गेले नाही. यापूर्वीच्या ऑस्ट्रेलिया मालिकेतही अर्शदीप चांगलाच महागडा ठरला होता.
दुसऱ्या टी20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेने डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे भारतीय संघाचा 5 विकेट्सने पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना भारताने 19.3 षटकांत 7 विकेट्स गमावून 180 धावा केल्या. पावसामुळे 3 चेंडू टाकता आले नाहीत. डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे दक्षिण आफ्रिकेला 15 षटकांत 152 धावांचे लक्ष्य मिळाले आणि त्यांनी हे लक्ष्य 13.5 षटकांत 5 विकेट्स गमावून पूर्ण केले. (Big statement of the legend about ‘this’ bowler of Team India He said Since IPL)
महत्वाच्या बातम्या
World Cup 2023 Finalच्या पराभवानंतर रोहितचा पहिला Interview, वेदना लपवू शकला नाही कर्णधार; Video करेल भावूक
पॅट कमिन्सबद्दल भारतीय दिग्गजाची मोठी भविष्यवाणी; म्हणाला, ‘आयपीएल लिलावात त्याच्यावर…’