भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने आत्ताच महिला खेळाडूंची सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट यादी जाहीर केली आहे. तसेच मेन्स संघासाठी यादी अद्याप घोषित केली नाही, पण ही यादी घोषित करण्याआधीच वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. महिला खेळाडूंच्या यादीमध्ये 16 खेळाडू सामील आहेत. तसेच मेन्स क्रिकेटर खेळाडूंच्या जुन्या यादीत 30 खेळाडूंची नावे सामील आहेत. एक नवी गोष्ट समोर येत आहे की अ प्लस कॅटेगरी बद्दल बोर्डाचे सर्व सदस्य सहमत नाहीत.
एनडीटीव्ही मध्ये छापलेल्या एका रिपोर्टनुसार सेंट्रल कॉन्ट्रॅक्टची यादी राष्ट्रीय निवड समिती द्वारा तयार केली जात आहे. यादी तयार करण्यासाठी भारतीय संघाचे हेड प्रशिक्षक आणि बीसीसीआयचे सचिव देवजीत सखिया यांचा सल्ला घेतला जात आहे. तसेच सध्या अ प्लस कॅटेगरीमध्ये रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांची नावे सामील आहेत. पण नव्या अपडेट नुसार बोर्डातील सर्व सदस्य अ प्लस कॅटेगरीमध्ये सामील खेळाडूंना रिटेन करण्याबाबत सहमत नाहीत.
जे खेळाडू तीनही फॉरमॅटमध्ये खेळतात त्यातीलच काही मेन खेळाडूंना अ प्लस कॅटेगरीमध्ये स्थान देण्यात येते. रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा टी20 क्रिकेट मधून निवृत्त झाले आहेत. कदाचित हेच कारण आहे की, त्यांना अ प्लस कॅटेगरीमध्ये ठेवण्यात शंका निर्माण होत आहे. पण बीसीसीआय मधील एका सदस्यांचे म्हणणं आहे की, जशी यादी आहे , ती आहे तशीच ठेवावी.
रविचंद्रन अश्विन बीसीसीआयच्या कॉन्ट्रॅक्ट लिस्ट मधून बाहेर होईल, कारण त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली आहे. तसेच आता भारताच्या टी20 संघाचा उपकर्णधार म्हणून निवड केलेला अक्षर पटेल याला ब कॅटेगरी मधून अ कॅटेगरीमध्ये स्थान देण्यात आले आहे. या हंगामात श्रेयस अय्यर 11 वनडे आंतरराष्ट्रीय सामने खेळलेला आहे. त्यामुळे त्याला पुन्हा सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट यादीमध्ये स्थान मिळू शकते.