नुकताच भारत विरुद्ध न्युझीलंड या दोन्ही संघांमध्ये दोन कसोटी सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेतील पहिला कसोटी सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर पार पडला होता. हा सामना अनिर्णीत राहिला होता. दुसरा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पार पडला होता. या सामन्यात न्यूझीलंड संघाला ३७२ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता. या सामन्याच्या पहिल्याच दिवशी न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन दुखापतीमुळे बाहेर झाला होता. आता न्यूझीलंड संघाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे.
न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विलियम्सन हा फेब्रुवारी महिन्यापर्यंत फिट होऊ शकत नाही. येत्या फेब्रुवारी महिन्यात न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. ही मालिका येणाऱ्या वर्षात १७ फेब्रुवारी पासून सुरू होणार आहे.
न्यूझीलंड संघाचे मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टीड यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यांच्या मते केन विलियम्सनला पूर्णपणे फिट होण्यासाठी ८ ते ९ आठवड्यांचा कालावधी लागू शकतो. त्याच्या दुखापतीबाबत बोलताना गॅरी स्टीड म्हणाले की, ” केन लवकरच फिट होईल. गेल्या वेळी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा आणि इंडियन प्रीमियर लीगपूर्वी अशा प्रकारच्या दुखापतीतून सावरण्यासाठी त्याला आठ ते नऊ आठवडे लागले होते.”
तसेच ते पुढे म्हणाले की, “मी आशा करतो की, या वेळी देखील त्याला तितकाच वेळ लागेल. आम्ही यावेळी कुठलीही वेळ निश्चित करत नाहीये. ” येत्या जानेवारी महिन्यात न्यूझीलंड संघाचा सामना बांगलादेश संघाविरुद्ध होणार आहे. या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे.
त्यानंतर न्यूझीलंड संघ ३ वनडे सामन्यांच्या आणि १ टी२० सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलिया संघाचा सामना करणार आहे. ही मालिका ३० जानेवारी पासून सुरू होणार आहे. तर ही मालिका झाल्यानंतर दक्षिण आफ्रिका संघ दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध २ हात करेल.
महत्वाच्या बातम्या :
‘हा’ दिग्गज म्हणतोय, “भारतीय क्रिकेट म्हणजे गुणवान खेळाडूंची फॅक्टरी
पुन्हा क्रिकेटचं मैदान गाजवणार युवराज सिंग! व्हिडिओ शेअर करत म्हणे, ‘दुसऱ्या इनिंगची वेळ आलीय’