आशिया कप 2025 (Asia Cup 2025) ची तयारी सुरू झाली आहे. प्रेक्षक या स्पर्धेची खूप आतुरतेने वाट बघत आहेत. यावेळी आशिया कप टी-20 प्रकारात खेळला जाईल. असे मानले जात आहे की, या स्पर्धेसाठी 5 संघ निश्चित झाले आहेत.
भारत, पाकिस्तान, श्रीलंका, अफगाणिस्तान आणि बांगलादेश हे संघ स्पर्धेत सहभागी होण्याची शक्यता आहे. सहावा संघ कोणता असेल हे अजून ठरलेले नाही. काही अंदाज असेही आहेत की, सहावा संघ कदाचित खेळणार नाही. भारतीय संघाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव (Suryakumar yadav)करणार आहेत स्पर्धेचे पूर्ण वेळापत्रक अजून जाहीर झालेले नाही.
पण काही रिपोर्टनुसार ही स्पर्धा सप्टेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. काही वेळेस यूएई (संयुक्त अरब अमिराती) मध्ये स्पर्धा होऊ शकते. तसेच भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातला मोठा सामना 7 सप्टेंबरला होऊ शकतो. हा सामना या स्पर्धेतील सर्वात महत्वाचा सामना असेल.






