भारताचा क्रिकेटपटू रिषभ पंत (Rishabh Pant)याच्या दुखापतीबाबत सर्वांना जाणून घेण्याची उत्सुकता आहे. त्याच्याबाबत नवे हेल्थ अपडेट पुढे आले आहे. तो अजूनही डेहराडूनच्या मॅक्स स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. तो आयसीयूमध्ये असून उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहे, असे डॉक्टरांनी म्हटले आहे. तसेच त्याची विचारपूस रोहित शर्मा यानेही केली असे वृत्त समोर येत आहे.
भारताचा स्टार विकेटकीपर-फलंदाज पंत याचा शुक्रवारी (30 डिसेंबर) पहाटे मोठा कार अपघात झाला. हा अपघात दिल्ली-डेहराडून महामार्गावर झाला ज्यामधून तो थोडक्यात बचावला आहे. यामध्ये त्याच्या डोक्याला, पाठीला आणि पायाला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर डेहराडूनच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. हॉस्पिटलमध्ये त्याचे कुटुंब उपस्थित आहे. त्याच्या तब्येतीबाबत माहिती मिळवण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) फोन वाजत आहेत. आता नव्या माहितीनुसार, भारताचा कर्णधार रोहित शर्मा यानेही त्याची विचारपूस केली आहे. रोहित सध्या त्याची पत्नी रितिका आणि मुलगी समायरा यांच्यासोबत मालदीवमध्ये आहे.
“पंतला इतर कोणत्याही हॉस्पिटलमध्ये हलवण्याची सध्यातरी आवश्यकता नाही. त्याची एक प्लास्टिक सर्जरी झाली आहे,” असे हरिद्वार खानापूरचे विधायक उमेश कुमार यांनी म्हटले आहे.
बीसीसीआयही सतत डॉक्टरांच्या संपर्कात आहेत. त्यांनी पंतला दुसरीकडे हलवायचे की नाही याबाबत विचारणा केली आहे. त्याचबरोबर दिल्ली क्रिकेट संघाचे निर्देशक श्याम शर्मा, बॉलिवूडचे अभिनेते अनिल कपूर आणि अनुपम खेर यांनीही त्यांची भेट घेतली आहे. शर्मा यांनी एएनआयशी बोलताना म्हटले, “डॉक्टर त्याची चांगली काळजी घेत आहेत. बीसीसीआयही सतत संपर्कात असून त्याला याच हॉस्पिटलमध्ये ठेवल जाणार आहे. त्याला त्रास जरी होत असता तरी तो हसत आहे.”
पंतचा अपघात झाला तेव्हा तोच चालवत होता. त्याने सिटबेल्ट लावले नव्हते आणि त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले. गाडीचा वेग इतका होता की ती थेट एका खांबला धडकून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला गेली. यादरम्यान त्याची गाडी डिवायडरला धडकली. त्यानंतर गाडीने पेट घेतला आणि तो विंड स्क्रीन तोडून बाहेर आला. एक खड्डा चुकवण्याच्या नादात त्याचा अपघात झाला, असे पंतचे म्हणणे आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रमीझ राजा काय डोक्यावर पडलेत? पाकिस्तानच्या माजी कर्णधारानेच डागले टीकास्त्र
INDvSL: एक सलामीवीर तर आधीच बाहेर! श्रीलंकेविरुद्ध कोण येणार ओपनिंगला? ‘या’ 3 खेळाडूंमध्ये स्पर्धा