गोव्याचे फलंदाज स्नेहल कौथंकर आणि कश्यप बाकले यांनी रणजी ट्रॉफीमध्ये इतिहास रचला आहे. कश्यप बकले अरुणाचल प्रदेशविरुद्ध 300 धावा करून नाबाद परतला. तर स्नेहल कौंथकरनं नाबाद 314 धावा केल्या. दोन्ही खेळाडूंमध्ये तिसऱ्या विकेटसाठी 606 धावांची विक्रमी भागीदारी झाली. रणजी ट्रॉफीच्या इतिहासातील ही सर्वात मोठी भागीदारी आहे. या विक्रमी भागीदारीमुळे गोव्यानं पहिल्या डावात 2 बाद 727 धावा केल्या.
या सामन्यात प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या गोव्याची सुरुवात चांगली झाली नाही. गोव्याचे सलामीवीर इशान गाडेकर आणि सुयश प्रभुदेसाई हे लवकर पॅव्हेलियनमध्ये परतले. यानंतर स्नेहल कौथंकर आणि कश्यप बाकले यांनी मोर्चा सांभाळला. या दोघांनी अरुणाचल प्रदेशच्या गोलंदाजांना चांगलाच चोप देण्यास सुरुवात केली. कश्यप बकलेनं 269 चेंडूत 300 धावा केल्या. त्यानं आपल्या खेळीत 39 चौकार आणि 2 षटकार मारले. स्नेहल कौथंकरनं 215 चेंडूत 314 धावा केल्या. त्यानं आपल्या खेळीत 45 चौकार आणि 4 षटकार मारले. या दोन फलंदाजांच्या विक्रमी भागीदारीनंतर गोव्यानं पहिला डाव 2 बाद 727 धावांवर घोषित केला.
गोव्यानं पहिल्या डावात केलेल्या 727 धावांना प्रत्युत्तर देताना अरुणाचल प्रदेशचा पहिला डाव अवघ्या 84 धावांवर आटोपला. अशा प्रकारे गोव्याला पहिल्या डावाच्या जोरावर मोठी आघाडी मिळाली आहे. यानंतर गोव्यानं अरुणाचल प्रदेशला फॉलोऑन खेळण्यासाठी पाचारण केलं. दुसऱ्या डावात देखील अरुणाचल प्रदेशचे फलंदाज सपशेल प्लॉफ ठरले. संघ अवघ्या 92 धावांवर ऑलआऊट झाला. अशाप्रकारे गोव्यानं हा सामना एक डाव 551 धावांच्या मोठ्या फरकानं जिंकला.
हेही वाचा –
मोहम्मद शमी परतला! रणजी ट्रॉफीत जोरदार कामगिरी; टीम इंडियात संधी मिळेल का?
दक्षिण आफ्रिकेच्या या खेळाडूला मेगा लिलावात 10 कोटी रुपये मिळणार, डेल स्टेनचा अंदाज
3 दिग्गज फिरकीपटू जे आयपीएल 2025 मेगा लिलावात अनसोल्ड राहू शकतात






