भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना पर्थमध्ये खेळवला जात आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या सामन्याच्या चौथ्या दिवशीचा खेळ सुरु आहे. या सामन्याचा निकाल आज म्हणजेच सामन्याच्या चौथ्या दिवशी समोर येण्याची अपेक्षा आहे. ऑस्ट्रेलियासमोर 534 धावांचे लक्ष्य असून यजमान संघाने या बातमीखेरीस 79 धावांत 5 विकेट्स गमावल्या आहेत. अशा परिस्थितीत भारताला कसोटी क्रिकेटमध्ये धावांच्या बाबतीत सर्वात मोठा विजय नोंदवण्याची संधी आहे. भारताने 400 हून अधिक धावांनी विजय मिळवला तर परदेशी भूमीवरील धावांच्या बाबतीत हा सर्वात मोठा विजय ठरेल.
धावांच्या बाबतीत भारताचा कसोटी क्रिकेटमधील सर्वात मोठा विजय मायदेशात मिळाला आहे. या वर्षी फेब्रुवारीमध्ये राजकोटच्या मैदानावर भारताने इंग्लंडविरुद्ध 434 धावांनी विजय मिळवला होता. याशिवाय भारताने कधीही 400 पेक्षा जास्त धावांनी विजय मिळवलेला नाही. पर्थ कसोटी सामन्यात असे घडल्यास परदेशी भूमीवर भारताचा हा सर्वात मोठा विजय ठरेल. परदेशी भूमीवर भारताला सर्वात मोठा विजय वेस्ट इंडिजमध्ये मिळाला आहे. ऑगस्ट 2019 मध्ये नॉर्थ साउंडमध्ये भारताने वेस्ट इंडिजविरुद्धचा कसोटी सामना 318 धावांनी जिंकला.
भारताचा कसोटी क्रिकेटमधील सर्वात मोठा विजय (धावांनी)
434 धावा विरुद्ध इंग्लंड, राजकोट – फेब्रुवारी 2024
372 धावा विरुद्ध न्यूझीलंड, मुंबई – डिसेंबर 2021
337 धावा विरुद्ध दक्षिण आफ्रिका, दिल्ली – डिसेंबर 2015
321 धावा विरुद्ध न्यूझीलंड, इंदैर – ऑक्टोबर 2016
320 धावा विरुद्ध ऑस्ट्रेलिया, मोहाली – ऑक्टोबर 2008
परदेशातील सर्वात मोठा विजय (धावांनी)
318 धावा विरुद्ध वेस्ट इंडिज, नॉर्थ साउंड – ऑगस्ट 2019
304 धावा विरुद्ध श्रीलंका, गाले – जुलै 2017
279 धावा विरुद्ध इंग्लंड, लीड्स – जून 1986
278 धावा विरुद्ध श्रीलंका, कोलंबो – ऑगस्ट 2015
272 धावा विरुद्ध न्यूझीलंड, ऑकलंड – मार्च 1968
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पर्थ कसोटी सामन्याबद्दल बोलायचे झाले तर भारतीय संघाने पहिल्या डावात 150 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघ 104 धावांत गारद झाला. टीम इंडिया दुसऱ्या डावात फलंदाजीला आली. ज्यात यशस्वी जयस्वाल आणि विराटच्या शतकी खेळीमुळे भारताने 6 गडी बाद 487 धावा करुन डाव घोषित केला. अशा स्थितीत ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 534 धावांचे लक्ष्य मिळाले होते.
हेही वाचा-
आयपीएल चॅम्पियन कर्णधाराला खरेदीदार सापडला नाही, हे स्टार खेळाडूही अनसोल्ड!
मुंबई इंडियन्सने हिऱ्यासारखा खेळाडू गमावला! यामुळे सुवर्णसंधी वाया गेली
IPL 2025 AUCTION; पहिल्या दिवशी 72 खेळाडूंची विक्री; पंत-अय्यर सर्वात महागडे, डेव्हिड वाॅर्नर अनसोल्ड