भारतीय संघासाठी खेळणं प्रत्येक खेळाडूचं स्वप्नं असतं. हे स्वप्नं पूर्ण करण्यासाठी खेळाडू दिवस रात्र मेहनत करत असतात. तसेच देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करून हे खेळाडू भारतीय संघात स्थान मिळवत असतात. परंतु, काही खेळाडूंचे स्वप्नं अपूर्ण राहून जाते. ज्यामुळे खेळाडू दुसऱ्या देशात जाऊन आपले नशीब आजमावून पाहतात. काही महिन्यांपूर्वी उन्मुक्त चंदने भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करत अमेरिका संघाचे प्रतिनिधित्व करण्याचा निर्णय घेतला होता. आता आणखी एका खेळाडूने भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करत अमेरिकेत जाण्याचा निर्णय घेतला आहे.
भारतीय क्रिकेटपटू बिपुल शर्माने (Bipul Sharma retired) रविवारी (२६ डिसेंबर) भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. ही माहिती त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली आहे. पंजाबच्या अमृतसरमध्ये जन्मलेल्या या खेळाडूला आपल्या संपूर्ण कारकिर्दीत आंतरराष्ट्रीय सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. ज्यामुळे त्याने अमेरिकेत जाण्याचा निर्णय घेतला आहे.
त्याच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर त्याने एकूण ५९ प्रथम श्रेणी सामने खेळले. ज्यामध्ये त्याने ८ शतके आणि १७ अर्धशतकांच्या सहाय्याने ३०१२ धावांची खेळी केली. तसेच गोलंदाजी करताना त्याने १२६ गडी देखील बाद केले. त्याने २००५ मध्ये पंजाब संघासाठी पदार्पण केले होते.
अधिक वाचा – भारतीय पठ्ठ्याचा अमेरिकेत दणका! उन्मुक्त चंदने अवघ्या ५२ चेंडूत ठोकले शतक, गगनचुंबी षटकारांचा पाडला पाऊस
बिपुल शर्मा आता निवृत्ती जाहीर केल्यानंतर अमेरिकेला (America) जाणार आहे. त्यानंतर तो तिथेच क्रिकेट खेळणार आहे. त्याने इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत पंजाब किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने पंजाब, हिमाचल प्रदेश आणि सिक्कीम संघासाठी क्रिकेट खेळले आहे.
हे नक्की पाहा : ते परत आलेत! भारतीय क्रिकेटचे शिवधनुष्य पेलतेय ‘बॅच ऑफ १९९६’
निवृत्ती जाहीर करताना त्याने लिहिले की, ” २५ वर्षे, मी इतके दिवस खेळत आहे, यावर विश्वास बसत नाही. ज्या खेळावर मी आयुष्यभर प्रेम केले त्या खेळाला अखेर निरोप देण्याची वेळ आली आहे. या प्रवासात माझे कुटुंब, आई, काका, पत्नी, जे नेहमी माझ्या पाठीशी उभे राहिले त्या सर्वांचे आभार.”
https://www.instagram.com/p/CX8lgxil15B/
बिपुल शर्माची २०१० मध्ये पंजाब किंग्ज संघात निवड करण्यात आली होती. त्याने या संघाचे ४ वर्ष प्रतिनिधित्व केले. ज्यामध्ये त्याला १५ सामने खेळण्याची संधी मिळाली. त्यानंतर २०१६ मध्ये त्याने सनरायझर्स हैदराबाद संघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्याने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाविरुध झालेल्या अंतिम सामन्यात एबी डिविलियर्सला बाद केले होते.
महत्वाच्या बातम्या :
दर्जा कामगिरी! प्रत्येक देशातील मैदानांवर राहुलने उमटविला ‘शतकी’ ठसा
श्रीसंतची प्रतिक्षा संपणार! ९ वर्षांनंतर करणार ‘त्या’ मानाच्या स्पर्धेत पुनरागमन






