असे म्हणतात की, क्रिकेट मध्ये रेकॉर्ड बनतातच तुटण्यासाठी. मग तो रोहित शर्माचे एकदिवसीय क्रिकेट मधील व्ययक्तिक २६४ धावा असतील किंवा एबी डिव्हीलियर्सचे विश्व क्रिकेटमधील सर्वात वेगवान शतक असेल वा नुकताच इंग्लंड संघाने केलेला एकदिवसीय क्रिकेटमधील एका डावातील सांघीक धावसंख्येचा रेकॉर्ड असु देत, हे रेकॉर्ड कधी ना कधी तुटतील आणि नवीन बनतीलच. असाच काही रेकॉर्ड २४ जुन इंग्लंड येथे सुरु असलेल्या टी२० ब्लास्ट स्पर्धेतील एका सामन्यात झाला. या रेकॉर्ड सामन्याचा खरा शिल्पकार ठरला तो झंझावती शतक ठोकणारा ऍडम होसे.
इंग्लंड येथे सुरु असलेल्या टी२० ब्लास्ट स्पर्धेत शुक्रवारी बर्मिंघम बीयर्स आणि वॉरसेस्टरशायर विरुद्धच्या सामन्यात बर्मिंघम बीयर्स संघाने वॉरसेस्टरशायर १४४ धावांच्या मोठ्या फरकाने पराभूत केले आणि आपल्या नावे धावांच्या फरकाच्या दृष्टीने ही टी२० ब्लास्ट स्पर्धेच्या इतिहासातील हा सर्वात मोठा फरक आहे. या सामन्याचा मुख्य शिल्पकार आहे ठरला तो सामन्यात तडाखेबाज फलंदाजी करत शतक लगावलेला ऍडम होसे. होसेने कोणत्याच गोलंदाजाला जुमानले नाही. त्याने केवळ ५३ चेंडूत ११० धावांचा पाऊस पाडला. त्याच्या या शतकी खेळीच्या बळावर बर्मिंघम बीयर्स संघाने २० षटकांत २२८ धावांचा डोंगर उभारला. त्यानंतर या २२८ धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या वॉरसेस्टरशायर संघाचा डाव केवळ ८४ धावांवर संपुष्टात आला.
होसे जेव्हा फलंदाजीला आला तेव्हा संघाची स्थिती २ गडी बाद ३ धावा अशी होती. वॉरसेस्टरशायर संघाचा गोलंदाज मिचेल स्टेनलेने सलग दोन चेंडुवर दोन बळी घेत एलेक्स डेविस आणि सैम हैन यांना तंबुचा रस्ता दाखवला. हे दोन्ही फलंदाज शुन्या माघारी परतले. मात्र त्यानंतर फलंदाजीला आलेल्या होसेने प्रत्येक चेंडूला सीमारेषे बाहेर पाठवणे सुरु केले. आणि त्यानंतर मात्र त्याच्या फलंदाजीचा अंदाज काही बदलला नाही. होसेने आपल्या या खेळीत १३ चौकार आणि ४ षटकार लगावले. आणि नाबादच तंबुत परतला. त्याला साथ लाभली ती डॅन मौसलीची. डॅनने देखील चांगलीच फटकेबाजी करताना ३४ चेंडूत ३ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ५३ धावा कुटल्या.
दरम्यान, बर्मिंघम बीयर्स संघाने १२ सामन्यात ८ सामने जिंकत १६ गुणांसह पहिले स्थान आपल्या नावे केले आहे. लंकाशायर संघाचे ही १६ गुण आहेत मात्र बीयर्स संघाचा नेट रनरेट चांगला असल्यामुळे त्यांनी आपल्याकडे अग्रस्थान ठेवले आहे. वॉरसेस्टरशायर संघाला विजयाची लय गवसली नसुन त्यांनी ही आपले शेवटचे स्थान कायम ठेवले आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
सीएसकेच्या ‘या’ खेळाडूने रणजी फायनल सुरू असलेल्या स्टेडियममध्ये सहज मारला फेरफटका, कॅमेरात झाला कैद
एकमेवाद्वितीय बेन स्टोक्स! आजवर कोणालाही न जमलेला अष्टपैलूंचा वर्ल्ड रेकॉर्ड केला नावावर
रवी शास्त्रींचा प्रशिक्षक लक्ष्मणला कामाचा सल्ला; म्हणाले, ‘त्याला’ तिसऱ्या क्रमांकावर खेळवा, मग…