भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) आज गुरूवार (७ जुलै) आपला ४१वा वाढदिवस साजरा करत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर धोनीचा हा दुसराच जन्मदिवस आहे. त्याने १५ ऑगस्ट, २०२०मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्याने त्याच्या ४१व्या वाढदिवसाची सुरूवात एका अनोख्या पद्धतीने केली आहे. सध्या विम्बल्डन स्पर्धा सुरू आहेत. या स्पर्धेच्या बाद फेरीच्या एका सामन्याला धोनीने हजेरी लावली आहे.
या स्पर्धेसाठी खेळाडूंच्या पोषाखापासून ते रेफ्री, प्रेक्षकांसाठीही नियम आणि अटी लागू असल्याने धोनीही टेनिस कोर्टवर ग्रे ब्लेजर आणि पांढऱ्या शर्टमध्ये दिसला. विम्बल्डनमध्ये बुधवारी (६ जुलै) धोनीने त्याच्या मित्रांसमवेत सामन्यांना हजेरी लावली आहे. चेन्नई सुपर किंग्जने त्यांच्या सोशल मीडियाच्या अधिकृत अकांउटवरून धोनीचा या स्पर्धेतील फोटो शेयर केला आहे. चेन्नई सुपर किंग्जने (सीएसके) चार वेळा आयपीएलचे (इंडियन प्रीमियर लीग) विजेतेपद धोनीच्या नेतृत्वाखाली जिंकले आहे.
Yellove All! 🦁viewing the 🐐! #ThalaAtWimbledon 🎾 #WhistlePodu 🦁💛 pic.twitter.com/yyPJXqHYCK
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) July 6, 2022
धोनीचा आवडता टेनिसपटू स्पेनचा राफेल नदाल (Rafael Nadal) असून त्याने नदालच्या सामन्याला हजेरी लावली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच सीएसकेने धोनीच्या फोटोला दिलेल्या कॅप्शननुसार नदाल आणि अमेरिकेचा टेलर फ्रिट्ज (Taylor Fritz) यांच्यात पुरूष एकेरीचा उपउपांत्यपूर्व फेरीचा सामना सुरू होता. पाच सेटच्या या सामन्यात नदालने फ्रिट्जचा ३-६, ७-५, ३-६, ७-५, ७(१०)-६(४) असा पराभव करत उपांत्यफेरीत प्रवेश केला आहे. या सामन्यासाठी फुटबॉलचा दिग्गज डेविड बेकहम (David Beckham) देखील स्टेडियममध्ये उपस्थित होता.
An Indian icon watching on 🇮🇳#Wimbledon | @msdhoni pic.twitter.com/oZ0cNQtpXY
— Wimbledon (@Wimbledon) July 6, 2022
विम्बल्डनमध्ये बुधवारी (६ जुलै) सानिया मिर्झा पदार्पणाचा मिश्र दुहेरीचा सामना खेळत होती. यामध्ये तिचा साथीदार क्रोएशियाचा मेट पॅविच होता. या सामन्यांत त्यांना माजी विजेते नील स्कुपस्की आणि डिझेरे क्रॉझककडून ६-४, ५-७, ४-६ असे पराभूत व्हावे लागले.
हा सामना पाहण्यासाठी भारताचे दिग्गज सुनील गावसकर (Sunil Gavaskar) देखील कोर्टमध्ये दिसले. ते सध्या भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यांचे समालोचन करण्यासाठी इंग्लंडमध्ये आहेत. त्यांचेही फोटो सोशल मीडीयावर काही चाहत्यांनी पोस्ट केले आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘विराटला विश्रांतीची गरज नाही’, कोहलीच्या बालपणीच्या प्रशिक्षकाकडून पाठराखण
वाढदिवस विशेष: एमएस धोनीच्या करियरची टाईमलाईन
‘आयपीएल हंगाम संपूर्ण खेळता, पण भारताकडून खेळताना विश्रांती घेता’, रोहित-विराटवर चाहत्यांचा रोष