क्रिकेट विश्वात अनेक विक्रम बनवले जातात. तसेच तो तोडले ही जातात. परंतु असा एक विक्रम आहे, जो अजुनपर्यंत तोडला गेला नाहीये. होय,तुम्हाला ऐकून विश्वास बसणार नाही की, एकच कसोटी सामना खेळून क्रिकेटपटूने पुढील वर्षी “क्रिकेटर ऑफ द इयर”चा पुरस्कार पटकावला होता. हा कारनामा जिम पार्क्स यांनी केली होता. नुकताच त्यांचा वाढदिवस झाला.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इंग्लंड संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या, जिम पार्क्स यांचा जन्म १२ मे १९०३ मध्ये झाला होता. जिम पार्क्स हे उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू होते. ते वेगवान गोलंदाज होते आणि फलंदाजी मध्ये देखील तुफान फटकेबाजी करायचे. त्यांचे भाऊ हॅरी पार्क्स देखील क्रिकेटर होते. त्यामुळे हे दोघेही बंधू क्रिकेटचा सराव करत असत. हे इतक्यात थांबले नव्हते, पुढे जाऊन त्यांचा नातू देखील क्रिकेटपटू झाला होता.
अजूनही मोडला गेला नाही विक्रम
जिम पार्क्स हा उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू होता. त्याने तीसचे दशक अक्षरशः गाजवून ठेवले होते. याच दशकात त्याने प्रथम श्रेणी क्रिकेट खेळताना २ मोठे विक्रम आपल्या नावावर केले होते. जे अजूनही तोडले गेले नाहीये.त्याने १९३५ च्या हंगामात ससेक्स संघाकडून खेळताना तब्बल १००० धावा ठोकल्या होत्या. यासोबतच १०० गडी देखील बाद केले होते. हा कारनामा करून झाल्याच्या दोन वर्षानंतर त्याने काउंटी हंगामात सर्वांनाच आश्चर्यचकित करून ठेवले होते. त्याने एकाच हंगामात तब्बल ३००३ धावा आणि १०१ गडी देखील बाद केले होते. तो असा कारनामा करणारा एकमेव क्रिकेटपटू आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फ्लॉप
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सुवर्ण कामगिरी केल्यानंतर, त्याला इंग्लंड संघाकडून पदार्पण करण्याची संधी मिळाली होती.परंतु त्याला या संधीचे सोने करता आले नव्हते. त्याने १९३७ मध्ये न्यूझीलंड संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात २२ आणि ७ धावांची खेळी केली होती. यासोबतच ३ गडी बाद केले होते. त्यानंतर त्याला संघात स्थान देण्यात आले नव्हते. त्याने आपल्या कारकीर्दीत एकच आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.
बनला बेस्ट क्रिकेटर पुरस्काराचा मानकरी
असे क्वचितच पहायला मिळते की, एखादया क्रिकेटपटूला केवळ १ आंतरराष्ट्रीय सामना खेळून बेस्ट क्रिकेटर पुरस्कार मिळतो. ज्या वर्षी पार्क्सने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ३००० धावा ठोकल्या होत्या. त्याच वर्षी त्याला १ आंतरराष्ट्रीय सामना खेळण्याची संधी मिळाली होती. त्यानंतर त्याला “विस्डेन क्रिकेटर ऑफ द इयर” चा पुरस्कार देखील देण्यात आला होता. हा पुरस्कार त्याची प्रथम श्रेणी क्रिकेटमधील कामगिरी पाहून देण्यात आला होता.
जिम पार्क्सची कारकीर्द
जिम पार्क्स याने १९२४ पासून ते १९३९ पर्यंत प्रथम श्रेणी क्रिकेट खेळले.ज्यामध्ये त्याने ४६८ सामने खेळले होते. यात त्याला विक्रमी २१,३६९ धावा आणि ८५२ गडी बाद करण्यात यश आले होते. या आकडेवारीत आणखी वाढ झाली असती. परंतु १९३९ मध्ये झालेल्या दुसऱ्या विश्व युद्धामुळे खेळांवर बंदी घालण्यात आली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
धोनीचे आगमन ते आयपीएलला स्थगिती; चेन्नई सुपर किंग्सने शेअर केलेला व्हिडिओ पाहून चाहते झाले भावूक
इंग्लंडपाठोपाठ न्यूझीलंडचे खेळाडूही ‘या’ कारणामुळे मुकणार उर्वरित आयपीएल २०२१ हंगामाला?