आज(17 आॅक्टोबर) भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज अनिल कुंबळे त्याचा 48 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत 956 विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे.
तसेच दुखापतग्रस्त असतानाही खेळण्याची जिद्द असणाऱ्या कुंबळेने कसोटी सामन्यात एकाच डावात 10 फलंदाजांना बाद करण्याचा विक्रमही केला आहे. त्याचबरोबर कुंबळेने भारतीय क्रिकेट संघाचे यशस्वी प्रशिक्षकपदही सांभाळले आहे.
अशा या भारताच्या सर्वात यशस्वी गोलंदाज अनिल कुंबळबद्दलच्या या खास गोष्टी-
-17 आॅक्टोबर 1970 मध्ये अनिल कुंबळेचा जन्म कर्नाटकमधील बंगळूरुमध्ये झाला आहे.
– त्याच्या गोलंदाजीत असणाऱ्या विविधतेमुळे त्याचबरोबर त्याच्या उंचीमुळे त्याला जम्बो या टोपन नावानेही ओळखले जाते.
-कुंबळे हा जसा उत्तम क्रिकेटपटू आहे तसाच तो आभ्यासातही हुशार होता. त्याने क्रिकेटबरोबरच मॅकेनिकल इंजिनियरचेही शिक्षण पूर्ण केले आहे.
-त्याने वयाच्या 13 व्या वर्षी यंग्स क्रिकेटर्स क्लबमध्ये प्रवेश घेतला होता.
-त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये पहिला सामना कर्नाटककडून हैद्राबाद विरुद्ध वयाच्या 19 व्या वर्षी खेळला आहे.
-कुंबळे हा जरी फिरकीपटू असला तरी त्याने मध्यमगती गोलंदाज म्हणून क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात केली होती.
-कुंबळे हा कसोटी क्रिकेटमध्ये 400 विकेट घेणारा कपिल देव नंतरचा दुसराच गोलंदाज आहे.
-तो कसोटी क्रिकेटमध्ये एका डावात सर्वाधिक वेळा 5 विकेट घेणारा भारतीय गोलंदाज आहे. त्याने हा कारनामा 30 वेळा केला आहे.
Happy Birthday @anilkumble1074 – On the occasion of the former Captain's birthday, we look back at one of his most iconic Test match spells 🎂😎
Watch 👉👉▶️ https://t.co/ASlc379aDp pic.twitter.com/cyp1tcJf6J— BCCI (@BCCI) October 17, 2018
-कुंबळेला 1995 मध्ये अर्जून पुरस्कारने गौरविण्यात आले आहे. तसेच 2005 मध्ये त्याचा पद्मश्री पुरस्कारानेही सन्मान करण्यात आला आहे. त्याचबरोबर त्याला 1996 या वर्षातील विस्डेनचा सर्वोत्तम क्रेकटपटूचा पुरस्कार मिळाला आहे.
-कुंबळे हा कसोटी क्रिकेटमध्ये एकाच डावात 10 विकेट घेणारा केवळ दुसरा गोलंदाज आहे. त्याने 1998 मध्ये फिरोजशहा कोटला मैदानात पाकिस्तान विरुद्ध हा पराक्रम केला आहे.
-2002 मध्ये विंडिज विरुद्ध अँटीग्वा कसोटीत हनवटीचे फ्रॅक्चर असतानाही त्याने गोलंदाजीला येऊन दोन विकेट घेतल्या होत्या. यातील ब्रायन लाराची महत्त्वाची विकेट त्याने घेतली होती.
-कुंबळे हा आयपीएलमध्ये बेंगलोर संघाकडून खेळला असून तो 2009 आणि 2010 च्या मोसमात सर्वाधिक विकेट घेणारा दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आहे.
-जून 2016 मध्ये कुंबळेने भारतीय संघाचे प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्विकारली होती. त्यानंतर त्याने एक वर्ष ही जबाबदारी संभाळली. पण कर्णधार विराट कोहलीने प्रशिक्षक बदलीसाठी केलेल्या मागणीनंतर त्याने जून 2017 मध्ये प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला.
-कुंबळेने चेतना समतिर्थ हीच्याशी तिचा पहिल्या लग्नाच्या घटस्पोटानंतर लग्न केले आहे.
619 Test wickets 🔴
337 ODI wickets ⚪️
One of two men to take 10 wickets in a Test innings 💪Happy birthday to India's top international wicket-taker, @anilkumble1074! pic.twitter.com/gZrst7JsC3
— ICC (@ICC) October 17, 2018
महत्त्वाच्या बातम्या:
–सचिन, धोनी प्रमाणेच कोहली करणार मायदेशात हा मोठा पराक्रम
–पृथ्वी शॉला मिळू शकते रोहित शर्माबरोबर वनडेमध्ये फलंदाजी करण्याची संधी
–सचिनचा हा ‘विराट’ रेकॉर्ड मोडण्याची कोहलीला संधी