fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

एकदा- दोनदा नाही तर चक्क ६व्यांदा करणार विराट हा पराक्रम

रविवारपासून (21 ऑक्टोबर) भारत विरुद्ध विंडीज यांच्यात पाच सामन्यांची वनडे मालिका सुरू होणार आहे. या मालिकेत भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीला वनडे क्रिकेटमध्ये 2018 या कॅलेंडर वर्षात 1000 धावा करण्याची संधी आहे. असा पराक्रम तो सहाव्यांदा करेल.

याआधी विराटने वनडेमध्ये 2011, 2012, 2013, 2014 आणि 2017 या वर्षांमध्ये प्रत्येकी एक हजारपेक्षा सर्वाधिक धावा केल्या आहेत.

यावर्षी विराटने 9 वनडे सामन्यांत खेळताना 3 शतके आणि 3 अर्धशतकांच्या सहाय्याने 749 धावा केल्या आहेत. यामुळे त्याला 1000 धावा पूर्ण करण्यासाठी 251 धावांची गरज आहे.

तसेच इंग्लंडचा सलामीवीर फलंदाज जॉनी बेअरस्टो यावर्षी वनडे क्रिकेटमध्ये 1000 धावा करणारा पहिला फलंदाज ठरला आहे. यावर्षी त्याने वनडे क्रिकेटमध्ये 21 सामन्यात 48.61 च्या सरासरीने 1021 धावा पूर्ण केल्या आहेत. यात त्याच्या 4 शतके आणि 2 अर्धशतकांचा समावेश आहे.

2018 या वर्षात वनडेमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज-

1021 धावा – जॉनी बेअरस्टो (21 सामने)

896 धावा – जो रुट (21 सामने)

804 धावा – जेसन रॉय (19 सामने)

785 धावा – शिखर धवन (14 सामने)

749 धावा – विराट कोहली (9 सामने)

महत्त्वाच्या बातम्या:

सचिन, धोनी प्रमाणेच कोहली करणार मायदेशात हा मोठा पराक्रम

पृथ्वी शॉला मिळू शकते रोहित शर्माबरोबर वनडेमध्ये फलंदाजी करण्याची संधी

सचिनचा हा ‘विराट’ रेकॉर्ड मोडण्याची कोहलीला संधी

You might also like