महान अष्टपैलू खेळाडू गॅरी सोबर्स आज आपला ८३वा वाढदिवस साजरा करत आहेत. विंडीजच्या या महान खेळाडूने १९५४ ते १९७४ या काळात आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले. विशेष म्हणजे त्यांनी ५१ वर्षांपुर्वी एकाच षटकांत चक्क ६ षटकार खेचले होते. ३१ ऑगस्ट १९६८ रोजी पहिल्यांदाच क्रिकेटमध्ये असे काहीतरी घडले होते.
१९६८च्या हंगामात ग्लॅमोर्गन आणि नाॅटींगघमशायर दरम्यान झालेल्या सामन्यात ते नाॅटींगघमशायरचे नेतृत्व करत होते.
एकवेळ नाॅटींगघमशायरची ५ बाद ३०८ अशी अवस्था असताना स्वानसीमध्ये सुरु असलेल्या या सामन्यात सोबर्स यांनी झटपट धावा करण्यासाठी ७६ धावांची ही आक्रमक खेळी केली होती. लवकर डाव घोषीत करुन गोलंदाजांना लगेच गोलंदाजीची संधी देण्यासाठी त्यांनी आक्रमक खेळी करण्याचा हा निर्णय घेतला होता.
त्यावेळी माल्कन नॅश या कमनशिबी गोलंदाजाला तेव्हा या स्फोटक फलंदाजीचा सामना करावा लागला. डावखुरा वेगवान गोलंदाज असलेल्या नॅशकडे कर्णधाराने चेंडू सोपवला. पहिल्याच चेंडूवर षटकार बसल्यावर त्याने गोलंदाजीत बदल केले परंतु सोबर्स यांनी त्याला ६ षटकार खेचलेच.
यातील एक चेंडू तर सोबर्स यांच्या बॅटवर नीट आला नाही. त्यात सीमारेषेवर क्षेत्ररक्षकाने त्यांचा झेल घेतला परंतु तो तेव्हा सीमारेषेच्या बाहेर असल्यामुळे हा झेल देण्यात आला. शेवटच्या चेंडूवर तर सर्व क्षेत्ररक्षक सीमारेषेवर असुनही त्यांनी षटकार खेचला होता.
यानंतर त्यांनी लगेच डाव घोषीत केला आणि ते हा सामना पुढे जाऊन जिंकलेही.
पुढे १७ वर्षांनी रवी शास्त्री यांनी मुंबई विरुद्ध बडोदा सामन्यात (१९८५) हा पराक्रम केला. तर २००७ला युवराज सिंगने टी२० विश्वचषकात इंग्लंडविरुद्ध हा पराक्रम केला. तसेच हर्षल गिब्जनेही २००७मध्येच ५० षटकांच्या विश्वचषकात विंडीजमध्ये नेदरलॅंडविरुद्ध हा कारनामा केला होता.
https://twitter.com/BBCRNS/status/1035407911453949952?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1035407911453949952&ref_url=https%3A%2F%2Fmahasports.glteyepbzg-jqp3vl997450.p.temp-site.link%2F1st-bowler-hit-for-6-sixes-in-1-over-was-pacer-bowling-spin%2F
https://twitter.com/mohanstatsman/status/903160042706239488?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E903160042706239488&ref_url=https%3A%2F%2Fmahasports.glteyepbzg-jqp3vl997450.p.temp-site.link%2F1st-bowler-hit-for-6-sixes-in-1-over-was-pacer-bowling-spin%2F