न्यूझीलंडचा दिग्गज फिरकीपटू डॅनियल व्हेट्टोरी आज (27 जानेवारी) आपला 44 वा वाढदिवस साजरा करत आहे. व्हेट्टोरीचा जन्म 27 जानेवारी 1979 रोजी न्यूझीलंड मधील ऑकलॅंड शहरात झाला होता. त्याचे वडील इटलीचे तर आई न्यूझीलंडची आहे. व्हेट्टोरीला लहानपणापासूनच क्रिकेटची आवड होती व त्याने अतिशय कमी वयात स्थानिक क्रिकेटमध्ये उत्तम कामगिरी करत नावलौकिक मिळवला होता. विशेष म्हणजे व्हेट्टोरी वयाच्या केवळ अठराव्या वर्षी न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यात पदार्पण करण्यात यशस्वी ठरला. न्यूझीलंड क्रिकेट इतिहासात सर्वाधिक कमी वयात कसोटी पदार्पण करण्याचा विक्रम आजही व्हेट्टोरीच्याच नावे आहे.
आपल्या पदार्पणाच्या सामन्यापासूनच डॅनियल व्हेट्टोरी (Daniel Vettori) याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केली होती. वयाच्या केवळ 21 व्या वर्षी तो 100 बळी मिळवणारा सर्वात युवा खेळाडू ठरला होता. गोलंदाजीत उत्तम कामगिरी करण्यासोबतच व्हेट्टोरीने अनेक महत्त्वाच्या क्षणी आपल्या फलंदाजीची क्षमता देखील जगाला दाखवून दिली.
न्यूझीलंडचे कर्णधारपद सांभाळण्याचाही मिळाला मान
आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचे फळ म्हणून 2007 साली व्हेट्टोरीला न्यूझीलंड संघाचे कर्णधार बनवण्यात आले. व्हेट्टोरीच्या नेतृत्वात न्यूझीलंडने 2009 आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत, तसेच 2011 विश्वचषकाच्या उपांत्यफेरी पर्यंत धडक मारली होती. विश्वचषक 2015 मधील अंतिम सामना हा व्हेट्टोरीच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमधील शेवटचा सामना ठरला.
विट्टोरीची उल्लेखनीय कामगिरी
चष्मा लावून खेळण्याच्या आणि त्याच्या केसांच्या लूकमुळे क्रिकेटचा ‘हॅरी पॉटर’ म्हणून ओळखला जाणाऱ्या व्हेट्टोरीने आपल्या दीर्घ आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमध्ये अनेक विक्रम आपल्या नावे केले. व्हेट्टोरीने आठव्या क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वाधिक 2227 धावा केल्या आहेत. 300 बळी व 3000 धावा करण्याची एक वेगळीच किमया व्हेट्टोरीने केली आहे. डावखुऱ्या हाताने फिरकी गोलंदाजी करणाऱ्या खेळाडूंमध्ये सर्वाधिक बळी मिळवण्याचा विक्रम देखील व्हेट्टोरीच्या नावे आहे. व्हेट्टोरीने आपल्या कारकिर्दीमध्ये 362 कसोटी बळी मिळवलेले आहेत.
व्हेट्टोरीने आपल्या आंतरराष्ट्रीय करियरमध्ये 113 कसोटी सामन्यात 362, तसेच 295 वनडे सामन्यांत 305 आणि 34 टी20 सामन्यात 38 बळी घेतलेले आहेत. तसेच फलंदाजीत देखील कौशल्य दाखवत व्हेट्टोरीने कसोटी मध्ये 4531 आणि वनडे मध्ये 2253 धावा केलेल्या आहेत. व्हेट्टोरीला आपल्या या शानदार कामगिरीमुळेच न्यूझीलंड क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक मानले जाते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बाबर आझमच्या आधी ‘या’ दिग्गजांनी जिंकलाय आयसीसी सर्वात मोठा पुरस्कार, पाहा 2004 पासून संपूर्ण यादी
‘शोले- 2 चा दुसरा भाग लवकरच येतोय’…क्रिकेटमधील जय वीरुची मोठी घोषणा