---Advertisement---

वाढदिवस विशेष: क्रिकेटमधील सर्वात यशस्वी यष्टीरक्षक मार्क बाउचरबद्दल काही खास गोष्टी…

On: मंगळवार, डिसेंबर 3, 2019 1:49 PM
---Advertisement---

क्रिकेटच्या इतिहासात अनेक उत्कृष्ट यष्टीरक्षक होऊन गेले. यातील एक दिग्गज यष्टीरक्षक म्हणजे दक्षिण आफ्रिकेचा मार्क बाउचर. तो आज(3 डिंसेंबर) त्याचा 43वा वाढदिवस साजरा करत आहे.

बाउचरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यष्टीमागे सर्वाधिक असे 998विकेट घेतले आहेत. तसेच त्याने गोलंदाजी करताना कसोटीत एक विकटही घेतली आहेत.

यष्टीमागे 1000 विकेट पूर्ण करण्यास 2 विकेट बाकी असताना त्याला 2012च्या दरम्यान इंग्लंड विरुद्धच्या दौऱ्यात डोळ्याला दुखापत झाल्याने क्रिकेटमधून निवृत्ती घ्यावी लागली होती.

त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्याबद्दलच्या या खास गोष्टी:

– 3 डिसेंबर,1976मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या पूर्व लंडन शहरात जन्म झाला. वेरडॉन आणि हेथर बाउचर मार्कचे पालक असून त्याला दोन बहीणी आहेत.

– पूर्व लंडनच्या बॉर्डर येथील शाळेकडून तो क्रिकेट, स्क्वॉश, स्विमींग, टेनिस आणि रग्बी या खेळांमध्ये सहभागी झाला आहे. तो दक्षिण आफ्रिकेचा ज्युनियर स्क्वॉश चॅम्पियनही होता.

– रिचर्ड पायबस हे मार्कचे प्रशिक्षक होते. त्यांनी पाकिस्तान, विंडीज आणि बांगलादेश संघासोबत काम केले आहे. त्यांनी एका विकेटकिपींगच्या कॅम्पवेळी बाउचरमधील कौशल्य ओळखले.

– बाउचरची 1995ला इंग्लंड दौऱ्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या 19 वर्षाखालील संघात निवड झाली होती. त्या मालिकेत त्याने सलामीला फलंदाजी केली होती.

– दक्षिण आफ्रिकेकडून आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये यष्टीमागे सर्वाधिक 19 विकेट घेणारा बाउचर पहिलाच खेळाडू ठरला.

– 2005मध्ये विंडीज विरुद्धच्या कसोटी सामन्यात त्याने गोलंदाजी करताना ड्वेन ब्रावोला बाद केले होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गोलंदाजी करतानाची ही एकमेव विकेट बाउचरच्या नावावर आहे.

– दक्षिण आफ्रिकेकडून खेळताना त्याने फक्त एकाच सामन्यात यष्टीरक्षण केले नाही. 2010मध्ये विंडीज विरुद्धच्या पाच वन-डे सामन्यांपैकी चार सामने तो खेळला नव्हता. तर पाचव्या सामन्यात त्याने यष्टीरक्षण केले नव्हते. तसेच या सामन्यात त्याने क्षेत्ररक्षण करताना एक झेलही घेतला होता.

– 1998पासून दक्षिण आफ्रिकेच्या वरिष्ठ संघात खेळताना बाउचरने 13 वर्षाच्या वन-डे कारकिर्दीत 295 सामन्यात यष्टीमागे 424 विकेट घेतल्या. तसेच त्याने कसोटीमध्ये 147 सामन्यात 555 विकेट्स घेतल्या आहेत आणि टी20मध्ये त्याने 25 सामन्यात 19 विकेट्स यष्टीमागे घेतल्या आहेत.

– 2011च्या आयपीएल (इंडियन प्रीमियर लीग) हंगामात मार्कला कोणत्याच संघाने विकत न घेतल्याने त्याने समालोचन केले होते. मात्र कोलकाता नाइट रायडर्सचा क्रिकेटपटू ब्रॅड हॅडिन दुखापतग्रस्त झाल्याने त्याने नंतर कोलकता संघाकडून मधल्या फळीत फलंदाजी केली होती.

– निवृत्तीनंतर तो दक्षिण आफ्रिकेमध्ये होणाऱ्या गेंड्याच्या तस्करी विरोधासाठी काम करत आहे. यासाठी त्याची बाउचर लीगसी नावाची संस्थाही आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---