न्यूझीलंडमध्ये सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउंसिल (आयसीसी, ICC) महिला वनडे विश्वचषक २०२२ चा थरार सुरू आहे. ४ मार्चपासून ही स्पर्धा सुरू झाली आहे. मात्र भारतीय संघ रविवार अर्थात ६ मार्चपासून त्यांच्या विश्वचषक अभियानाची सुरुवात करेल. भारताचा विश्वचषकातील पहिला सामना पारंपारिक प्रतिद्वंद्वी पाकिस्तान संघाविरुद्ध (IND vs PAK) होणार आहे. बे ओव्हल स्टेडियम, माउंट मौनगानुई येथे सकाळी ६.३० वाजता हा सामना रंगणार आहे. या सामन्यापूर्वी पाकिस्तान संघाची कर्णधार बिस्माह मारूफ हिने मोठे वक्तव्य केले आहे.
Pakistan and India captains exchanging greetings on the eve of their match. How excited are you? #CWC22 #BackOurGirls pic.twitter.com/fTEawDeiUI
— Pakistan Cricket (@TheRealPCB) March 5, 2022
काय म्हणाली बिस्माह
एका व्हिडिओमध्ये पाकिस्तानची कर्णधार बिस्माह तिची सहकारी खेळाडू डायना बेगच्या एका प्रश्नाचं उत्तर देत आहे. जेव्हा तिला विचारण्यात आले की, विश्वचषकातील तिची सर्वोत्तम आठवणी कोणती आहे? तेव्हा ती म्हणाली की, जेव्हा आम्ही भारताला भारतातच पराभूत केले तो क्षण सर्वोत्तम आठवणींपैकी एक आहे. पहिल्याच सामन्यात भारताला पराभूत करून विश्वचषकात चांगली लय मिळवण्याचा आमचा प्रयत्न असेल, असे ती म्हणाली.
Captain @maroof_bismah previews the #CWC22 in a conversation with @baig_diana #BackOurGirls #TeamPakistan pic.twitter.com/lK04PCosGW
— Pakistan Cricket (@TheRealPCB) March 5, 2022
पाकिस्तानच्या संघाने आतापर्यंत भारताविरुद्ध खेळलेले सर्व १० एकदिवसीय सामने गमावले आहेत. भारताचा पाकिस्तानविरुद्धचा विजयाचा आकडा १०-० असा आहे. पाकिस्तानी कर्णधार ज्या पराभवाचा उल्लेख करत आहे, तो पराभव २०१६ च्या टी२० विश्वचषकातील आहे. तो सामना दिल्लीत खेळला गेला होता.
२०२२ महिला क्रिकेट विश्वचषकासाठी भारतीय संघ
मिताली राज (कर्णधार), हरमनप्रीत कौर (उपकर्णधार), स्मृती मंधना, शफाली वर्मा, यास्तिका भाटिया, दीप्ती शर्मा, रिचा घोष (यष्टीरक्षक), स्नेह राणा, झुलन गोस्वामी, पूजा वस्त्राकर, मेघना सिंग, रेणुका सिंग ठाकूर, तानिया भाटिया (यष्टीरक्षक), राजेश्वरी गायकवाड, पूनम यादव.
स्टँडबाय खेळाडू: एस. मेघना, एकता बिश्त, सिमरन दिल बहादूर.
रोहित-विराट यांच्यात आहे का वाद? हा व्हिडिओ पाहून मिळेल उत्तर (mahasports.in)